Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

लोणावळ्यात वंचित बहुजन आघाडीच्या नवनिर्वाचित प्रदेश कार्यकारिणीची बैठक संपन्न; ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती 

mosami kewat by mosami kewat
August 8, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
लोणावळ्यात वंचित बहुजन आघाडीच्या नवनिर्वाचित प्रदेश कार्यकारिणीची बैठक संपन्न; ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती 
       
लोणावळा : वंचित बहुजन आघाडीच्या नवनिर्वाचित प्रदेश कार्यकारिणीची बैठक लोणावळा येथे ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. लोकशाही पद्धतीने बॅलेट पेपरवर मतदान घेऊन कार्यकर्ते व सदस्यांनी निवडून दिलेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या पुढील संघटनात्मक वाटचालीसंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली.

वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी राजेंद्र पातोडे यांची निवड झाली असून, नवनिर्वाचित प्रदेश कार्यकारिणीत सुजात आंबेडकर, अरुण जाधव, इंजि. प्रशांत इंगोले, जितरत्न पटाईत, डॉ. चित्रा कुऱ्हे, दिपक डोके, नागोराव पांचाळ, सर्वजित बनसोडे, कृष्णा देशमुख, सारंग थोरात, ज्ञानेश्वर कवठेकर आणि उत्तम वनशिव यांचा समावेश आहे.

लोकशाही मार्गाने बॅलेट पेपरवर झालेल्या मतदानातून कार्यकर्ते व सदस्यांनी या प्रदेश कार्यकारिणीची निवड केली आहे. त्यामुळे नवनिर्वाचित कार्यकारिणीसमोर पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविणे, तळागाळातील कार्यकर्त्यांशी संपर्क अधिक मजबूत करणे आणि आगामी काळात पक्षाची भूमिका जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याची जबाबदारी असणार आहे.

बैठकीनिमित्त नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांच्यासह संपूर्ण प्रदेश कार्यकारिणीचे अभिनंदन करण्यात आले. तसेच वंचित बहुजन आघाडीच्या पुढील संघटनात्मक वाटचालीसाठी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

Tags: MaharashtraPoliticalPrakash AmbedkarpuneVanchit Bahujan Aaghadiलोणावळा
Previous Post

भिंतीपलीकडचा ‘भूतान’

Next Post

रोस्टर पद्धतीनेच भरती करा, अन्यथा राज्यभर आंदोलन करणार – राजेंद्र पातोडे 

Next Post
रोस्टर पद्धतीनेच भरती करा, अन्यथा राज्यभर आंदोलन करणार – राजेंद्र पातोडे 

रोस्टर पद्धतीनेच भरती करा, अन्यथा राज्यभर आंदोलन करणार - राजेंद्र पातोडे 

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home