Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

वंचित बहुजन आघाडीचा नांदेड दक्षिण जिल्ह्यात ‘संवाद दौरा’ संपन्न; गाव तिथे शाखा उभारण्याचा निर्धार

mosami kewat by mosami kewat
February 5, 2026
in Uncategorized, बातमी, राजकीय, सामाजिक
0
वंचित बहुजन आघाडीचा नांदेड दक्षिण जिल्ह्यात ‘संवाद दौरा’ संपन्न; गाव तिथे शाखा उभारण्याचा निर्धार
       
नांदेड : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या उद्देशाने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नांदेड दक्षिण जिल्ह्यात संघटन बांधणीसाठी ‘संवाद बैठक’ दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दौऱ्यांतर्गत बिलोली, धर्माबाद आणि उमरी या तीन तालुक्यांमध्ये बैठका पार पडल्या असून, “गाव तिथे शाखा” आणि सक्रिय सभासद नोंदणीचा संकल्प यावेळी करण्यात आला.

तिसऱ्या टप्प्यातील हा दौरा बिलोली (सकाळी ११), धर्माबाद (दुपारी २) आणि उमरी (सायंकाळी ४) अशा सलग तीन सत्रांत पार पडला. यावेळी आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत स्थानिक पातळीवर पक्ष बळकटीकरणावर सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी निवडणुका पूर्ण ताकदीने लढवण्याचा ठाम निर्णय कार्यकर्त्यांनी या बैठकीत घेतला. (Vanchit bahujan aghadi)

जिल्हाध्यक्ष शंकर महाजन आणि जिल्हा महासचिव रवि पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला. पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करताना शंकर महाजन म्हणाले की, जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी संघटन अधिक मजबूत करणे आवश्यक आहे. या दौऱ्यात जिल्हा उपाध्यक्ष अरुण भद्रे, विनायक गजभारे, गणपत सवयीसोनकांबळे, जिल्हा संघटक संजय टिके, पवन कांबळे, प्रसिद्धीप्रमुख नामदेव पांचाळ, विद्यानंद पवळे, रंगनाथ गजले, डॉ. रामचंद्र वनंजे आणि गौतम डुमणे या जिल्हा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. (Vanchit bahujan aghadi)

यावेळी शिलानंद बुद्धेवार, धम्मदीप गावंडे, पवन पाटील जाधव, गजानन चिंचले, पप्पू पाटील लाकडे, शिवा शिवशेटे, गंगाधर कांबळे, मारुती एडकेवार, एकनाथ जिंकले, गौतम देवके, जे. के. जोंधळे, चंद्रभीम हावजेकर, कपिल वाघमारे, अकबर शेख, करुणा खंडेलोटे, संदेश गायकवाड, गंगाधर लांडगे, के. एन. पवार यांसह तिन्ही बैठकीला तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: ElectionMaharashtranandedpolticsVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

Aurangabad: ‘वंचित’ची मते गेली कुठे? प्रभाग २४ च्या निकालावरून सुजात आंबेडकर आक्रमक

Next Post

प्रस्थापितांनी विकासनिधी लुटला; स्थानिक प्रश्नांसाठी ‘वंचित’ला विजयी करा: सुजात आंबेडकर

Next Post
प्रस्थापितांनी विकासनिधी लुटला; स्थानिक प्रश्नांसाठी ‘वंचित’ला विजयी करा: सुजात आंबेडकर

प्रस्थापितांनी विकासनिधी लुटला; स्थानिक प्रश्नांसाठी 'वंचित'ला विजयी करा: सुजात आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
प्रबुद्ध भारत वर्धापन दिनानिमित्त  वाचकांकडून शुभेच्छांचा वर्षाव!
बातमी

प्रबुद्ध भारत वर्धापन दिनानिमित्त  वाचकांकडून शुभेच्छांचा वर्षाव!

by mosami kewat
February 5, 2026
0

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ४ फेब्रुवारी १९५६ रोजी सुरू केलेल्या प्रबुद्ध भारत या ऐतिहासिक पाक्षिकाच्या 70 vya वर्धापन...

Read moreDetails
प्रस्थापितांनी विकासनिधी लुटला; स्थानिक प्रश्नांसाठी ‘वंचित’ला विजयी करा: सुजात आंबेडकर

प्रस्थापितांनी विकासनिधी लुटला; स्थानिक प्रश्नांसाठी ‘वंचित’ला विजयी करा: सुजात आंबेडकर

February 5, 2026
वंचित बहुजन आघाडीचा नांदेड दक्षिण जिल्ह्यात ‘संवाद दौरा’ संपन्न; गाव तिथे शाखा उभारण्याचा निर्धार

वंचित बहुजन आघाडीचा नांदेड दक्षिण जिल्ह्यात ‘संवाद दौरा’ संपन्न; गाव तिथे शाखा उभारण्याचा निर्धार

February 5, 2026
Aurangabad: ‘वंचित’ची मते गेली कुठे? प्रभाग २४ च्या निकालावरून सुजात आंबेडकर आक्रमक

Aurangabad: ‘वंचित’ची मते गेली कुठे? प्रभाग २४ च्या निकालावरून सुजात आंबेडकर आक्रमक

February 5, 2026
३३ तास, हजारो प्रवासी आणि शून्य सुविधा; हेच का तुमचे विकसित प्रशासन? – प्रकाश आंबेडकरांचा सरकारला सवाल

३३ तास, हजारो प्रवासी आणि शून्य सुविधा; हेच का तुमचे विकसित प्रशासन? – प्रकाश आंबेडकरांचा सरकारला सवाल

February 5, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home