Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

सोमनाथ सूर्यवंशी कोठडी मृत्यू प्रकरण: कायद्यातील त्रुटींवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर प्रहार; उद्या सुनावणी

mosami kewat by mosami kewat
February 4, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
सोमनाथ सूर्यवंशी कोठडी मृत्यू प्रकरण: कायद्यातील त्रुटींवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर प्रहार; उद्या सुनावणी

सोमनाथ सूर्यवंशी कोठडी मृत्यू प्रकरण: कायद्यातील त्रुटींवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर प्रहार; उद्या सुनावणी

औरंगाबाद : शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील हत्या प्रकरणाची आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयात बाजू मांडताना कायद्यातील गंभीर त्रुटींकडे लक्ष वेधले. (prakash ambedkar)

नेमका मुद्दा काय?

सुनावणी दरम्यान पोलीस खाते आणि गृहखात्याच्या मुख्य सचिवांच्या वतीने प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले. मात्र, ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी BNS १९६ (भारतीय नागरिक सुरक्षा संहिता) मधील एका मोठ्या त्रुटीवर बोट ठेवले.

यामध्ये कोठडीतील मृत्यूनंतर मॅजिस्ट्रेटने चौकशी केल्यानंतर पुढे नक्की कोणती पावले उचलावीत, याबाबत कायद्यात स्पष्ट तरतूद नाही. केंद्र आणि राज्य सरकारने आजवर या कायद्यात आवश्यक सुधारणा किंवा दुरुस्ती केलेली नाही. (prakash ambedkar)

गृहमंत्र्यांना न्यायालयात बोलवा – आंबेडकरांची मागणी

न्यायालयाला विनंती करताना आंबेडकर म्हणाले की, सध्या ज्या अधिकाऱ्यांना न्यायालयात पाचारण करण्यात आले आहे, त्यांना केवळ अंमलबजावणीचे अधिकार आहेत, धोरणात्मक निर्णय घेण्याचे नाही. त्यामुळे, सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देण्यासाठी न्यायालयाने स्वतः या कायद्यातील त्रुटी भरून काढाव्यात किंवा थेट गृह मंत्र्यांना न्यायालयात बोलावून ‘हा अपूर्ण कायदा पूर्ण करणार का?’ असा जाब विचारावा. (prakash ambedkar)

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या या आक्रमक युक्तिवादानंतर न्यायालयाने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पुढील सुनावणी उद्या सकाळी निश्चित केली आहे. त्यामुळे उद्याच्या सुनावणीत न्यायालय सरकारला काय निर्देश देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (prakash ambedkar)

परभणीतील पोलीस कोठडीत मृत्यू पावलेले शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या चौकशी प्रकरणी अखेर एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना ८ दिवसांत एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी एसआयटीची घोषणा केली होती. यावेळी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातोश्री विजयाबाई सूर्यवंशी उपस्थित होत्या.

Tags: AurangabadBenchBNS196BombayHighCourtbreakingnewsCustodialDeathHumanRightsViolationIndianJusticeSystemJudicialInquiry\JusticeForSomnathMaharashtraNewsPoliceAccountabilityPoliceCustodyDeathprakashambedkarRuleOfLawSomnathSuryavanshivanchitbahujanaghadi
Previous Post

खुलताबादमध्ये सुजात आंबेडकरांची तोफ धडाडली; वंचितच्या उमेदवार खुशबू शेख यांच्यासाठी शक्तीप्रदर्शन

Next Post

वडगाव-कोल्हाटी येथे सुजात आंबेडकरांची तोफ धडाडली; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांत उत्साह

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‘गृहमंत्र्यांना बोलवा!’ सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावर प्रकाश आंबेडकरांची खंडपीठात आक्रमक भूमिका
बातमी

‘गृहमंत्र्यांना बोलवा!’ सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावर प्रकाश आंबेडकरांची खंडपीठात आक्रमक भूमिका

by mosami kewat
February 4, 2026
0

औरंगाबाद : राज्यभर गाजत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणात आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात महत्त्वाची सुनावणी पार...

Read moreDetails
चेंबूरमध्ये बिल्डर सुशील रहेजाकडून बौद्ध कर्मचाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

चेंबूरमध्ये बिल्डर सुशील रहेजाकडून बौद्ध कर्मचाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

February 4, 2026
वंचितला एक संधी द्या, गावांचा कायापालट करू; रांजणगावच्या सभेत सुजात आंबेडकरांचे आवाहन

वंचितला एक संधी द्या, गावांचा कायापालट करू; रांजणगावच्या सभेत सुजात आंबेडकरांचे आवाहन

February 4, 2026
वडगाव-कोल्हाटी येथे सुजात आंबेडकरांची तोफ धडाडली; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांत उत्साह

वडगाव-कोल्हाटी येथे सुजात आंबेडकरांची तोफ धडाडली; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांत उत्साह

February 4, 2026
सोमनाथ सूर्यवंशी कोठडी मृत्यू प्रकरण: कायद्यातील त्रुटींवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर प्रहार; उद्या सुनावणी

सोमनाथ सूर्यवंशी कोठडी मृत्यू प्रकरण: कायद्यातील त्रुटींवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर प्रहार; उद्या सुनावणी

February 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home