Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वडगाव-कोल्हाटी येथे सुजात आंबेडकरांची तोफ धडाडली; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांत उत्साह

mosami kewat by mosami kewat
February 4, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
वडगाव-कोल्हाटी येथे सुजात आंबेडकरांची तोफ धडाडली; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांत उत्साह

वडगाव-कोल्हाटी येथे सुजात आंबेडकरांची तोफ धडाडली; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांत उत्साह

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकसाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ युवा नेते सुजात आंबेडकर यांची काल बुधवारी (दि. ४) जाहीर सभा वडगाव–कोल्हाटी येथे उत्साहात पार पडली. यावेळी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

या सभेत मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना सुजात आंबेडकर म्हणाले की, स्थानिक विकासासंदर्भातील महत्त्वाचे निर्णय जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सभागृहात घेतले जातात. त्यामुळे या ठिकाणी खऱ्या अर्थाने विकासासाठी काम करणारे आणि वंचित, बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी असणे अत्यंत गरजेचे आहे. (sujat ambedkar election campaign)

पुढे ते म्हणाले, वंचित बहुजन आघाडी सत्तेत आल्यास सर्वसामान्यांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य दिले जाईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. उत्तम आरोग्य सुविधा, दर्जेदार व सुरक्षित रस्ते, स्वच्छ पिण्याचे पाणी, गुणवत्तापूर्ण शिक्षण व्यवस्था तसेच शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सध्या सत्ताधारी पक्षांकडून वंचित समाजाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, वंचितांचे प्रश्न मांडणारा आणि त्यावर लढा देणारा पर्याय म्हणजे वंचित बहुजन आघाडी असल्याचे सुजात आंबेडकर यांनी सांगितले. (sujat ambedkar election campaign)

विकासासाठी आणि वंचितांच्या सशक्त प्रतिनिधित्वासाठी मतदारांनी एक संधी वंचित बहुजन आघाडीला द्यावी व पक्षाच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.

या जाहीर सभेला वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा नगरसेवक अमित भुईगळ, औरंगाबाद पश्चिम शहराध्यक्ष ॲड. पंकज बनसोडे, तसेच पक्षाचे पदाधिकारी, स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेदरम्यान कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

Tags: aurangabadElectiopolticsSujat AmbedkarVanchit Bahujan Aghadi
Previous Post

सोमनाथ सूर्यवंशी कोठडी मृत्यू प्रकरण: कायद्यातील त्रुटींवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर प्रहार; उद्या सुनावणी

Next Post

वंचितला एक संधी द्या, गावांचा कायापालट करू; रांजणगावच्या सभेत सुजात आंबेडकरांचे आवाहन

Next Post
वंचितला एक संधी द्या, गावांचा कायापालट करू; रांजणगावच्या सभेत सुजात आंबेडकरांचे आवाहन

वंचितला एक संधी द्या, गावांचा कायापालट करू; रांजणगावच्या सभेत सुजात आंबेडकरांचे आवाहन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पवनचक्की प्रकल्पांविरोधात शेतकरी व ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण; चौकशी व नुकसानभरपाईची मागणी
बातमी

पवनचक्की प्रकल्पांविरोधात शेतकरी व ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण; चौकशी व नुकसानभरपाईची मागणी

by mosami kewat
August 14, 2026
0

नंदुरबार : तालुक्यातील कोळदा, भागसरी, खोंडामळी, विखरण, कलमाडी, कानडदा, सिंदगव्हाण, भालेर, नगाव, काकदें, जुनमोहीदे आणि हाटामोहीदे या गावांच्या परिसरात सुरू...

Read moreDetails
धीरज परदेशी हत्येचा निषेध : चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

धीरज परदेशी हत्येचा निषेध : चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

August 14, 2026
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भाषणानंतर ‘शुद्धी हवन’; VBA चे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे म्हणाले, “जातीवाद आणि अस्पृश्यता आजही जिवंत”

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भाषणानंतर ‘शुद्धी हवन’; VBA चे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे म्हणाले, “जातीवाद आणि अस्पृश्यता आजही जिवंत”

August 14, 2026
शेवगाव : बालमटाकळी येथे मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

शेवगाव : बालमटाकळी येथे मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

August 14, 2026
बसवन संगोगी येथील जिल्हा परिषद मराठी-कन्नड प्राथमिक शाळेची दुरवस्था; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

बसवन संगोगी येथील जिल्हा परिषद मराठी-कन्नड प्राथमिक शाळेची दुरवस्था; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

August 14, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home