Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित बहुजन आघाडीसह विविध संघटनांचा तहसीलदार कार्यालयावर धडक!

mosami kewat by mosami kewat
February 4, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
वंचित बहुजन आघाडीसह विविध संघटनांचा तहसीलदार कार्यालयावर धडक!

वंचित बहुजन आघाडीसह विविध संघटनांचा तहसीलदार कार्यालयावर धडक!

वसई :  प्रजासत्ताक दिनी नाशिक येथील शासकीय कार्यक्रमात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जाणीवपूर्वक टाळणाऱ्या मंत्री गिरीश महाजन आणि त्या ‘मनुवादी’ मानसिकतेचा वसईत तीव्र निषेध करण्यात आला. वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने यावेळी मंत्र्यांच्या वृत्तीचा ‘जोडे मारून’ निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनामुळे तहसील कार्यालय परिसर दणाणून गेला होता.

या निषेध आंदोलनामध्ये केवळ वंचित बहुजन आघाडीच नव्हे, तर भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी-लेनिनवादी), प्रजा सुराज्य पक्ष आणि बहुजन विकास संघटना यांनीही सक्रिय सहभाग नोंदवून आपला पाठिंबा दर्शविला. (vanchit bahujan aghadi)

आंदोलक महिलांनी यावेळी संताप व्यक्त केला की, ज्यांच्या संविधानामुळे हा देश खऱ्या अर्थाने ‘प्रजासत्ताक’ झाला, त्या महामानवाच्या सन्मानासाठी आज आम्हाला रस्त्यावर उतरून मागणी करावी लागते, ही मोठी शोकांतिका आहे. १५ ऑगस्टचे सत्तांतर आणि २६ जानेवारीचे सार्वभौमत्व हे केवळ बाबासाहेबांच्या कष्टामुळे यशस्वी झाले आहे.

प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनातील प्रमुख मागण्या- 

१. शासनाच्या २०१७ च्या परिपत्रकानुसार (GR), सर्व शासकीय कार्यालयांत महामानवांच्या प्रतिमा पूजनाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी.

२. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख ‘भारतीय लोकशाहीचे जनक’ म्हणून होणे अनिवार्य करावे.

३. महामानवांना डावलणाऱ्या अधिकारी किंवा मंत्र्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी.

या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन महिला आघाडीच्या अध्यक्षा गीता जाधव आणि सचिव संगीता ताई सपकाळ यांनी केले. यावेळी साक्षी जाधव महासचिव, रेखा वाकोडे, संगीता लंकेश्वर, जितेंद्र शिरसाट, उपाध्यक्ष सुविध पवार, फिरोज शेख, अमोल गांगुड़े, विट्ठल गायकवाड़, आनंद जाधव, हनीफ शेख, विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  (vanchit bahujan aghadi)

Tags: ConstitutionDr Babasaheb AmbedkarpolticsRepublic day २०२६Vanchit Bahujan Aghadivbaforindia
Previous Post

‘वंचित’च्या प्रचाराचा धडाका! हक्काच्या विकासासाठी आणि शेतकरी प्रश्नांसाठी ‘वंचित’ला साथ द्या: सुजात आंबेडकर

Next Post

खुलताबादमध्ये सुजात आंबेडकरांची तोफ धडाडली; वंचितच्या उमेदवार खुशबू शेख यांच्यासाठी शक्तीप्रदर्शन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
कोण आहेत वंचित बहुजन आघाडीने नवे प्रदेशाध्यक्ष?
बातमी

कोण आहेत वंचित बहुजन आघाडीने नवे प्रदेशाध्यक्ष?

by mosami kewat
August 5, 2026
0

मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी राजेंद्र निरंजन पातोडे यांची निवड झाल्यानंतर राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. परंतु महाराष्ट्रभर त्यांच्या...

Read moreDetails
नवी मुंबईत आरपीआय (आ) गटाला मोठे खिंडार; दिघाचे कार्याध्यक्ष अनिल अंगरख यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश 

नवी मुंबईत आरपीआय (आ) गटाला मोठे खिंडार; दिघाचे कार्याध्यक्ष अनिल अंगरख यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश 

August 5, 2026
शेयर मार्केटमधील , विशेषतः तरुण, गुंतवणूकदारांसाठी “कोरियन” धडे !  

शेयर मार्केटमधील , विशेषतः तरुण, गुंतवणूकदारांसाठी “कोरियन” धडे !  

August 5, 2026
नाशिकमध्ये खड्ड्यांच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचे तिरडी आंदोलन; रस्ते खड्डेमुक्त करण्याची मागणी

नाशिकमध्ये खड्ड्यांच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचे तिरडी आंदोलन; रस्ते खड्डेमुक्त करण्याची मागणी

August 5, 2026
लोकशाही पद्धतीने वंचित बहुजन आघाडीची प्रदेश कार्यकारिणी निवड; राजेंद्र पातोडे प्रदेशाध्यक्ष

लोकशाही पद्धतीने वंचित बहुजन आघाडीची प्रदेश कार्यकारिणी निवड; राजेंद्र पातोडे प्रदेशाध्यक्ष

August 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home