Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा भाजपाचा डाव उधळून लावा – ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

mosami kewat by mosami kewat
January 9, 2026
in Uncategorized
0
प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा भाजपाचा डाव उधळून लावा – ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन
       

पुण्यात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांसाठी सभा

पुणे : छोट्या व प्रादेशिक पक्षांना फोडून त्यांना कमकुवत करण्याचे काम भारतीय जनता पक्षाने केले आहे. काँग्रेसमध्ये अवसान राहिलेले नाही. त्यामुळे विरोधी पक्षांना संपवून एकपक्षीय राजवट आणण्याचा भाजपचा डाव उधळून लावा,” असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मतदारांना केले. हुकुमशाही पद्धतीने वागणाऱ्या भाजपाशी दोन हात करण्याची धमक केवळ वंचित बहुजन आघाडीकडेच आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

पुणे महानगरपालिका निवडणूक प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून, वंचित बहुजन आघाडीच्या प्रभाग ६ आणि प्रभाग १३ मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ ॲड. प्रकाश आंबेडकर यांची येरवडा येथील लक्ष्मीनगर भागात जाहीर सभा झाली. प्रभाग क्रमांक १३ मधील डॉ. निकिता गायकवाड, रामिजा रज्जाक नरसणगी, स्वाती सुरेश धनगर, अ‍ॅड. गजानन श्रीराम चौधरी, तसेच प्रभाग क्रमांक ६ मधील शैलेश ऊर्फ पाला मोरे, सलमा सादिक शेख उपस्थित होते.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सरचिटणीस प्रियदर्शन तेलंग, शहराध्यक्ष अरविंद तायडे, माजी आमदार ॲड. जयदेव गायकवाड यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजू ओव्हाळ यांनी सभेचे संयोजन केले. प्राण आवाड यांनी सूत्रसंचालन केले.

ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान दिले. मात्र आज संविधानात बदल करण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. संविधान धोक्यात आहे, हे आपल्याला समजून घ्यावे लागेल. संविधानाच्या रक्षणासाठी जागृत राहावे लागेल. कारण जोवर आपण जागरूक आहोत, तोवर संविधानाला हात लावण्याची हिंमत होणार नाही. भाजपाला हरवायचे असेल, तर आपल्याला शंभर टक्के मतदान करावे लागेल. सामान्यांच्या हक्कांसाठी, शोषित, पीडित, वंचित व मागास घटकांसाठी न्याय मिळवून देणार्‍या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून देणे ही आपली जबाबदारी आहे. लोकांची घरे, पक्ष फोडून, भ्रष्टाचारी लोकांना पक्षात घेऊन राजकारणाचे तीनतेरा वाजवणाऱ्या भाजपला घरी बसवण्याची वेळ आली आहे, अशा खरमरीत शब्दांत आंबेडकरांनी भाजपवर हल्ला चढविला. 

आज काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अवस्था दयनीय असून, एका शिवसेनेत जान नाही, तर दुसर्‍या शिवसेनेला खच्ची करण्याचे काम भाजपने केले आहे. अशावेळी जनतेच्या हितासाठी काम करणारे व लढणारे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन आंबेडकर यांनी केले.

जयदेव गायकवाड म्हणाले, पुणे शहरातील फुले शाहू आंबेडकरी विचारांचे लोक एकवटले असून, वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे राहताना दिसत आहेत. काँग्रेससह अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना सर्वानीच शहराचे वाटोळे करण्याचे काम केले आहे. अलिकडेच अजित पवार यांनी महार वतनाची जमीन लाटण्याचा केलेला प्रयत्न, तसेच शरद पवार यांचा पक्ष गिळंकृत करण्याचा केलेला प्रयत्न याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये रोष आहे. या निवडणुकीत गुंडांना पाठीशी घालून त्यांना उमेदवारी देणार्‍या भाजप आणि राष्ट्रवादीला पराभूत करण्याचे काम आपल्याला करायचे आहे.”


       
Previous Post

चीनसारखी एकाधिकारशाही भाजपला भारतात आणायची! ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सावधानतेचा इशारा

Next Post

भाजपने गाठला निर्लज्जपणाचा कळस ! चिमुकल्यांवरील अत्याचाराशी संबंधित आरोपीला भाजपकडून नगरसेवकपद

Next Post
भाजपने गाठला निर्लज्जपणाचा कळस ! चिमुकल्यांवरील अत्याचाराशी संबंधित आरोपीला भाजपकडून नगरसेवकपद

भाजपने गाठला निर्लज्जपणाचा कळस ! चिमुकल्यांवरील अत्याचाराशी संबंधित आरोपीला भाजपकडून नगरसेवकपद

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सातारा जिल्ह्यात धक्कादायक प्रकार; सहावीच्या विद्यार्थिनींकडून दहावीच्या उत्तरपत्रिका तपासल्याचा आरोप
बातमी

सातारा जिल्ह्यात धक्कादायक प्रकार; सहावीच्या विद्यार्थिनींकडून दहावीच्या उत्तरपत्रिका तपासल्याचा आरोप

by mosami kewat
March 12, 2026
0

सातारा : दहावी आणि बारावीच्या पेपरफुटीच्या बातम्या अधूनमधून समोर येत असतात. मात्र आता सातारा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर...

Read moreDetails
OBC क्रिमी लेयर ठरवताना केवळ पालकांचे उत्पन्न निकष ठरणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय !

OBC क्रिमी लेयर ठरवताना केवळ पालकांचे उत्पन्न निकष ठरणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय !

March 12, 2026
Bigg Boss 19 Winner: ५० लाख आणि कार अजूनही मिळेना? गौरव खन्नाचा खळबळजनक खुलासा!

Bigg Boss 19 Winner: ५० लाख आणि कार अजूनही मिळेना? गौरव खन्नाचा खळबळजनक खुलासा!

March 12, 2026
खालापूरचा खूनी हल्ला, युक्रांद चळवळ व भारिपसह परिवर्तनवादी पक्ष-२

खालापूरचा खूनी हल्ला, युक्रांद चळवळ व भारिपसह परिवर्तनवादी पक्ष-२

March 12, 2026
इराण युध्दात ट्रम्प तात्या पुन्हा एकदा "चिकन आऊट" होतील काय ?

इराण युध्दात ट्रम्प तात्या पुन्हा एकदा “चिकन आऊट” होतील काय ?

March 12, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home