मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी (VBA) ने थेट नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी आपले उमेदवार उभे केले आहेत. या पार्श्वभूमीवर, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पक्ष उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे भावनिक आणि महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाच्या सर्व उमेदवारांना खास दाद दिली आहे. ते म्हणाले की, “एका बाजूला पैशांचा महापूर असतांना वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी वंचितांच्या बाजूने, फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांच्या बाजूने लढण्याचा मानस केला आहे आणि ते लढत आहेत.”
पैठण नगरपरिषद निवडणूक : वंचित बहुजन आघाडीचे दोन प्रभागातून उमेदवार अर्ज दाखल
वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि उमेदवारांनी आर्थिक बळावर अवलंबून असलेल्या प्रस्थापित पक्षांविरुद्ध उभी केलेली ही लढाई विचारधारेची आणि स्वाभिमानाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
गॅस सिलेंडर’ निशाणीवर मतदान करण्याचे आवाहन ॲड. आंबेडकरांनी यावेळी सर्व फुले-शाहू-आंबेडकरवाद्यांना आवाहन केले आहे की, अशा निष्ठावान कार्यकर्त्यांना त्यांनी सक्रिय साथ दिली पाहिजे. “या सर्व उमेदवारांची निशाणी गॅस सिलेंडर आहे. गॅस सिलेंडर समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा,” असे आवाहन ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मतदारांना केले आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच लोकशाही प्रक्रिया बळकट करण्यासाठी मतदारांनी ‘गॅस सिलेंडर’ निशाणीला मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.






