Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरण: ‘नवोदय’ प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; अंजलीताई आंबेडकरांकडून पीडित कुटुंबाचे सांत्वन

mosami kewat by mosami kewat
February 2, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरण: ‘नवोदय’ प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; अंजलीताई आंबेडकरांकडून पीडित कुटुंबाचे सांत्वन
       
लातूर : जवाहर नवोदय विद्यालय, औसा येथील सहावीत शिकणाऱ्या अनुष्का पाटोळे हिच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात शाळा प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या दाव्यांवर पालकांनी तीव्र संशय व्यक्त केला असून, आता या लढ्यात वंचित बहुजन आघाडीने ठाम भूमिका घेतली आहे.

नेमकी घटना काय?

काही दिवसांपूर्वी विद्यालयाच्या परिसरात अनुष्काचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला होता. शाळा प्रशासनाने ही ‘आत्महत्या’ असल्याचे प्राथमिक दर्शनी भासवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनुष्काचे वय, तिची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि घटनास्थळावरील परिस्थिती पाहता पालकांनी आणि ग्रामस्थांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. (Anjali ambedkar)

वंचितांना सत्तेत पोहोचवणे हीच काळाची गरज! उजनीत वंचित बहुजन आघाडीची भव्य जाहीर सभा; सुजात आंबेडकरांचे जोरदार आवाहन

अंजलीताई आंबेडकरांची भेट 

आज वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी पीडित पाटोळे कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली.

या भेटीनंतर वंचित समूहातील मुलांच्या बाबतीत प्रशासन नेहमीच उदासीन का असते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच शाळा प्रशासन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. (Anjali ambedkar)

अंजलीताई आंबेडकर यांनी अनुष्काच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

“जोपर्यंत अनुष्का पाटोळेला न्याय मिळत नाही आणि दोषींवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. असे अंजलीताई आंबेडकर यावेळी म्हणाल्या. (Anjali ambedkar)

‘सबका साथ’ फक्त घोषणाच; अर्थसंकल्पातून उपेक्षित घटक पुन्हा वाऱ्यावर – डॉ. इंद्रजित अलटे

या प्रकरणामुळे निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आता पोलीस प्रशासन आणि शासन यावर काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags: Anjali AmbedkarAundhacrimegirllaturMaharashtraPoliticalSucideVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

वंचितांना सत्तेत पोहोचवणे हीच काळाची गरज! उजनीत वंचित बहुजन आघाडीची भव्य जाहीर सभा; सुजात आंबेडकरांचे जोरदार आवाहन

Next Post

नगरपालिकांच्या यशानंतर आता ‘लक्ष्य’ जिल्हा परिषद; अहिल्यानगरमध्ये वंचित बहुजन आघाडीची रणनीती निश्चित

Next Post
नगरपालिकांच्या यशानंतर आता ‘लक्ष्य’ जिल्हा परिषद; अहिल्यानगरमध्ये वंचित बहुजन आघाडीची रणनीती निश्चित

नगरपालिकांच्या यशानंतर आता 'लक्ष्य' जिल्हा परिषद; अहिल्यानगरमध्ये वंचित बहुजन आघाडीची रणनीती निश्चित

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home