Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

नगरपालिकांच्या यशानंतर आता ‘लक्ष्य’ जिल्हा परिषद; अहिल्यानगरमध्ये वंचित बहुजन आघाडीची रणनीती निश्चित

mosami kewat by mosami kewat
February 2, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
नगरपालिकांच्या यशानंतर आता ‘लक्ष्य’ जिल्हा परिषद; अहिल्यानगरमध्ये वंचित बहुजन आघाडीची रणनीती निश्चित
       
अहिल्यानगर : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने अहिल्यानगरमध्ये आपली कंबर कसली आहे. दक्षिण आणि उत्तर जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक नुकतीच पार पडली. 

या बैठकीत आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याचा किंवा भाजप वगळून इतर समविचारी पक्षांना सोबत घेऊन मैदानात उतरण्याचा महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे.(Vanchit bahujan aghadi)

राज्यात नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर, वंचित बहुजन आघाडीने आता आपला मोर्चा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकडे वळवला आहे. या बैठकीच्या निमित्ताने, गेल्या निवडणुकीत पक्षाकडून लढलेल्या उमेदवारांचा राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी मंदा अडागळे आणि आस्मा शेख यांनी पक्षाची विचारधारा स्वीकारत वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला. तसेच यावेळी जामखेड नगर परिषदेचे नगरसेविका संगीता भालेराव, राज्य उपाध्यक्ष दिशा शेख, उत्कर्षा रूपवते आणि महासचिव किसन चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले. (Vanchit bahujan aghadi)

राज्य महासचिव किसन चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, “२०१९ पासून कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे फळ आज दिसत आहे. शंभरहून अधिक नगरसेवक निवडून आल्यानंतर आता हीच विजयाची परंपरा ग्रामीण भागात नेण्याचा आमचा निर्धार आहे.” राज्य प्रवक्ते प्रा. अरुण जाधव आणि उत्कर्षा रूपवते यांनीही आगामी काळात ग्रामीण भागातील सर्वसामान्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यावर भर दिला. (Vanchit bahujan aghadi)

या बैठकीस राज्य उपाध्यक्ष दिशा शेख, आदिवासी नेते अनिल जाधव, दक्षिण जिल्हाध्यक्ष योगेश साठे, उत्तर जिल्हाध्यक्ष संतोष चोळके, जिल्हा महासचिव प्रसाद भिवसने, मधुकर साळवे, योगेश क्षीरसागर, अजित कुऱ्हाडे, सोमनाथ भैलुमे, फैरोज पठाण यांसह विविध तालुक्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष चोळके यांनी केले, तर आभार प्रसाद भिवसने यांनी मानले.

Tags: ahmadnagarElectionLocal body election campaignMaharashtraPoliticalVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरण: ‘नवोदय’ प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; अंजलीताई आंबेडकरांकडून पीडित कुटुंबाचे सांत्वन

Next Post

वंचित बहुजन आघाडीचा नांदेड जिल्ह्यात संवाद बैठक दौरा; निवडणुकीसाठी ‘गाव तिथे शाखा’ अभियानावर भर

Next Post
वंचित बहुजन आघाडीचा नांदेड जिल्ह्यात संवाद बैठक दौरा; निवडणुकीसाठी ‘गाव तिथे शाखा’ अभियानावर भर

वंचित बहुजन आघाडीचा नांदेड जिल्ह्यात संवाद बैठक दौरा; निवडणुकीसाठी ‘गाव तिथे शाखा’ अभियानावर भर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home