Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

शेतकरी हित आणि आरोग्य सुविधा हीच आमची प्राथमिकता; चाकूरमध्ये सुजात आंबेडकरांच्या सभेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद

mosami kewat by mosami kewat
February 1, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
शेतकरी हित आणि आरोग्य सुविधा हीच आमची प्राथमिकता; चाकूरमध्ये सुजात आंबेडकरांच्या सभेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद
       
लातूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीने आपली पूर्ण ताकद झोकून दिली आहे. युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत जानवळ (ता. चाकूर) येथे झालेली जाहीर सभा प्रचंड गर्दीमुळे लक्षवेधी ठरली. घोषणाबाजी आणि उत्साही वातावरणाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

सभेला संबोधित करताना सुजात आंबेडकर यांनी प्रस्थापित राजकारणावर प्रहार करत वंचित बहुजन आघाडीची विकासात्मक धोरणे मांडली. ते म्हणाले की, बळीराजाला न्याय मिळवून देण्यासाठी वंचित कटिबद्ध आहे. रस्ते, स्वच्छ पिण्याचे पाणी आणि सर्वोत्तम आरोग्य सुविधा हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. (Sujat ambedkar zilla parishad champing)

पुढे ते म्हणाले, वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी केवळ वंचित बहुजन आघाडीकडेच ठोस भूमिका आहे. “स्थानिक विकासाचे मॉडेल बदलण्यासाठी आणि सामान्यांच्या हाताला सत्ता देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला एक संधी द्या,” असे आवाहन सुजात आंबेडकर यांनी यावेळी केले.

‘सबका साथ’ फक्त घोषणाच; अर्थसंकल्पातून उपेक्षित घटक पुन्हा वाऱ्यावर – डॉ. इंद्रजित अलटे

या सभेला वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावून उमेदवारांचे बळ वाढवले. यावेळी या जाहीर सभेला अविनाश भोसीकर (राज्य कार्यकारिणी सदस्य), संतोष सूर्यवंशी (मराठवाडा महासचिव), अमोल लांडगे (युवा आघाडी राज्य सदस्य तथा नगरसेवक गटनेता), मंजुषा निंबाळकर (जिल्हाध्यक्ष), यांच्यासह सुजाता अजनिकर, आकाश इंगळे आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व अधिकृत उमेदवार उपस्थित होते. (Sujat ambedkar zilla parishad champing)

हे निव्वळ पोकळ दावे, अर्थसंकल्पातून मध्यमवर्गीय आणि वंचित घटक गायब – ॲड. प्रकाश आंबेडकर

सुजात आंबेडकरांच्या या सभेला झालेली तुफान गर्दी पाहता, लातूरमधील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी इतर पक्षांसमोर मोठे आव्हान उभे करणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. तरुणांचा वाढता प्रतिसाद हा निवडणुकीच्या निकालात निर्णायक ठरू शकतो.

Tags: ChakurdevelopmentElection campaignElection newsLocal body electionMaharashtraPoliticalpolticsSujat AmbedkarVanchit Bahujan AaghadivbaforindiaZilla school
Previous Post

‘सबका साथ’ फक्त घोषणाच; अर्थसंकल्पातून उपेक्षित घटक पुन्हा वाऱ्यावर – डॉ. इंद्रजित अलटे

Next Post

वंचितांना सत्तेत पोहोचवणे हीच काळाची गरज! उजनीत वंचित बहुजन आघाडीची भव्य जाहीर सभा; सुजात आंबेडकरांचे जोरदार आवाहन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home