Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

हे निव्वळ पोकळ दावे, अर्थसंकल्पातून मध्यमवर्गीय आणि वंचित घटक गायब – ॲड. प्रकाश आंबेडकर 

mosami kewat by mosami kewat
February 1, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
हे निव्वळ पोकळ दावे, अर्थसंकल्पातून मध्यमवर्गीय आणि वंचित घटक गायब – ॲड. प्रकाश आंबेडकर 
       
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज १ फेब्रुवारी २०२६ रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. सीतारामन यांनी सलग नवव्यांदा अर्थसंकल्प मांडला. यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या अर्थसंकल्पाचे वर्णन ‘पोकळ दावे’ असल्याचे म्हणाले.

सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रकाश आंबेडकर यांनी या अर्थसंकल्पाला ‘केवळ श्रीमंतांसाठी असलेला अर्थसंकल्प’ असे म्हटले आहे. (Union Budget 2026)

यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, अर्थसंकल्पात SC, ST आणि OBC समाजासाठी कोणत्याही ठोस धोरणात्मक तरतुदींचा किंवा फायद्यांचा उल्लेख नाही. अर्थमंत्र्यांनी केवळ शब्दांचा खेळ केला. तसेच मध्यमवर्गीयांना कर सवलतीची अपेक्षा होती, मात्र त्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. वाढत्या महागाईतून सुटका करण्यासाठी या अर्थसंकल्पात कोणतीही पावले उचलली नसल्याचे त्यांनी नमूद केले.

पुढे ते म्हणाले,  शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या किमान आधारभूत किमतीला (MSP) कोणतेही कायदेशीर संरक्षण देण्यात आलेले नाही. शेतकऱ्यांसाठी या अर्थसंकल्पात काहीही ठोस नाही, असे आंबेडकर म्हणाले. (Union Budget 2026)

आर्थिक धोरणांवर प्रश्नचिन्ह:

 रुपयाचे घसरते मूल्य आणि भांडवली ओघ (Capital inflows) कमी होणे यांसारख्या गंभीर आर्थिक समस्यांकडे सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. केंद्र सरकारने या अर्थसंकल्पात पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक यांसारख्या बिगर-भाजप शासित राज्यांना त्यांचा योग्य वाटा न देता डावळले आहे असे ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Tags: budgetBudget 2026EconomicsMaharashtramumbaiNew DelhiPoliticalPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

भाजपच्या ‘श्रद्धांजली’ जाहिरातीतून राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचे संकेत? 

Next Post

रेणापूर तालुक्यात वंचितची डरकाळी; सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत हारवाडीत जाहीर सभा 

Next Post
रेणापूर तालुक्यात वंचितची डरकाळी; सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत हारवाडीत जाहीर सभा 

रेणापूर तालुक्यात वंचितची डरकाळी; सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत हारवाडीत जाहीर सभा 

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home