Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

रेणापूर तालुक्यात वंचितची डरकाळी; सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत हारवाडीत जाहीर सभा 

mosami kewat by mosami kewat
February 1, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
रेणापूर तालुक्यात वंचितची डरकाळी; सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत हारवाडीत जाहीर सभा 
       
रेणापूर : लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीचे प्रचाराचा धडाका सुरू आहे. हारवाडी (ता. रेणापूर) येथे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची जाहीर सभा नुकतीच पार पडली. या सभेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून, सुजात आंबेडकरांनी स्थानिक प्रश्न मांडले. 

सभेला संबोधित करताना सुजात आंबेडकर म्हणाले की, ही निवडणूक केवळ सत्ता मिळवण्यासाठी नसून स्थानिक विकासाची आहे. शेतकरी, रस्ते, पाणी, आरोग्य आणि मूलभूत सुविधा यांपासून सामान्य जनता आजही वंचित आहे. जोपर्यंत वंचित आणि शोषितांना योग्य राजकीय प्रतिनिधित्व मिळत नाही, तोपर्यंत हे प्रश्न सुटणार नाहीत, असे प्रतिपादन त्यांनी केले. (Sujat ambedkar election campaign)

जनतेच्या समस्यांसाठी ‘एक संधी’ द्या

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मतदारांना आवाहन केले की, आपल्या हक्काच्या माणसांना सत्तेत पाठवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा. तसेच जनतेच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी हाच एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी यावेळी ठामपणे मांडले. (Sujat ambedkar election campaign)

या प्रचार सभेला वंचित बहुजन आघाडीच्या  नेत्यांनी हजेरी लावली होती. यामध्ये संतोष सूर्यवंशी (मराठवाडा महासचिव), अमोल लांडगे (युवा आघाडी राज्य सदस्य तथा नगरसेवक), मंजुषा निंबाळकर (जिल्हाध्यक्ष) आर. के. आचार्य (तालुकाध्यक्ष), ज्येष्ठ नेते कमलाकर चिकटे यांच्यासह जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सर्व उमेदवार व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: laturMaharashtraPoliticalSujat AmbedkarVanchit Bahujan AaghadivbaforindiaZilla Parishad
Previous Post

हे निव्वळ पोकळ दावे, अर्थसंकल्पातून मध्यमवर्गीय आणि वंचित घटक गायब – ॲड. प्रकाश आंबेडकर 

Next Post

ही निवडणूक जात-धर्माची नाही, तर विकासाची; सुजात आंबेडकरांचे शिरूर ताजबंदमध्ये आवाहन

Next Post
ही निवडणूक जात-धर्माची नाही, तर विकासाची; सुजात आंबेडकरांचे शिरूर ताजबंदमध्ये आवाहन

ही निवडणूक जात-धर्माची नाही, तर विकासाची; सुजात आंबेडकरांचे शिरूर ताजबंदमध्ये आवाहन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home