Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

ही निवडणूक जात-धर्माची नाही, तर विकासाची; सुजात आंबेडकरांचे शिरूर ताजबंदमध्ये आवाहन

mosami kewat by mosami kewat
February 1, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
ही निवडणूक जात-धर्माची नाही, तर विकासाची; सुजात आंबेडकरांचे शिरूर ताजबंदमध्ये आवाहन
       

लातूर : “आपल्या गावाचा, गणाचा आणि गटाचा विकास नेमका कसा असावा, हे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ठरवत असते. त्यामुळे ही निवडणूक जाती-धर्माच्या नावावर लढण्याची नसून, विकासाच्या मुद्द्यावर लढण्याची आहे. आतापर्यंत विकासाच्या नावाखाली जनतेची लूट करणाऱ्यांना सत्तेबाहेर ठेवा,” असे रोखठोक आवाहन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले.

लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर ताजबंद येथे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. लातूर येथील जाहीर सभेत नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. नागरिकांनी सुजात आंबेडकर यांच्या सभेला भरभरून प्रतिसाद दिला. (Sujat ambedkar Latur election campaign)

सभेला मार्गदर्शन करताना सुजात आंबेडकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महत्त्वावर भर दिला. ते म्हणाले की, रस्ते, स्वच्छ पिण्याचे पाणी आणि वीज या मूलभूत गरजांचा प्रश्न जिल्हा परिषदेतच सुटतो. दर्जेदार शाळा आणि आरोग्य सुविधा मिळवण्यासाठी योग्य प्रतिनिधी निवडणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव, पीकविमा आणि नुकसानभरपाई यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्तरावर काम होणे आवश्यक आहे. (Sujat ambedkar Latur election campaign)

सुजात आंबेडकर यांनी उपस्थितांना आवाहन केले की, मतदारांनी भावनिक मुद्द्यांना बळी न पडता केवळ विकासाच्या नावावरच मतदान केले पाहिजे. तसेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे जनतेच्या हक्कासाठी लढणारे असून, त्यांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या जाहीर सभेला वंचित बहुजन आघाडीचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. ज्यात अविनाश भोसीकर (राज्य सदस्य), संतोष सूर्यवंशी (मराठवाडा महासचिव), अमोल लांडगे (युवा आघाडी राज्य सदस्य तथा नगरसेवक), मंजुषा निंबाळकर (जिल्हाध्यक्ष), आर. के. आचार्य (तालुकाध्यक्ष), कमलाकर चिकटे (ज्येष्ठ नेते), यांच्यासह जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सर्व उमेदवार व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. 


       
Tags: Election campaignElection newslaturLocal body electionMaharashtraPoliticalpolticsSujat AmbedkarVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

रेणापूर तालुक्यात वंचितची डरकाळी; सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत हारवाडीत जाहीर सभा 

Next Post

‘सबका साथ’ फक्त घोषणाच; अर्थसंकल्पातून उपेक्षित घटक पुन्हा वाऱ्यावर – डॉ. इंद्रजित अलटे

Next Post
‘सबका साथ’ फक्त घोषणाच; अर्थसंकल्पातून उपेक्षित घटक पुन्हा वाऱ्यावर – डॉ. इंद्रजित अलटे

'सबका साथ' फक्त घोषणाच; अर्थसंकल्पातून उपेक्षित घटक पुन्हा वाऱ्यावर - डॉ. इंद्रजित अलटे

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home