Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

‎’लोकशाहीची खिल्ली उडवली जात आहे’, ‘शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष’ : सुजात आंबेडकरांचा आरएसएस, सरकारवर हल्लाबोल !‎‎

mosami kewat by mosami kewat
December 1, 2025
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
‎’लोकशाहीची खिल्ली उडवली जात आहे’, ‘शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष’ : सुजात आंबेडकरांचा आरएसएस, सरकारवर हल्लाबोल !‎‎
       
नागपूर : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी नागपूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत आरएसएस आणि राज्य सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ते नागपूर दौऱ्यावर होते.‎‎

सुजात आंबेडकर म्हणाले की, “जोपर्यंत RSS संविधानाच्या चौकटीत येत नाही, भारताचे संविधान मान्य करत नाही, स्वतःची नोंदणी करत नाही आणि तिरंगा फडकवत नाही, तोपर्यंत आमची आरएसएस विरोधातील लढाई सुरूच राहील.”‎‎

राज्यातील अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीबाबतही त्यांनी सरकारवर निशाणा साधला. “शेतकऱ्यांना अजूनही नुकसानभरपाई मिळालेली नाही. शेतकऱ्यांचा आक्रोश सर्वत्र दिसत आहे. सरकारने त्यांच्याकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे,” अशी टीका त्यांनी केली.

‎‎देशातील लोकशाही धोक्यात आल्याचा आरोप करत सुजात आंबेडकर म्हणाले, “आज उघडपणे लोकशाहीची खिल्ली उडवली जात आहे. भाजप लोकशाही संपवून स्वतःची मक्तेदारी निर्माण करत आहे.” यासोबतच त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही उद्देशून प्रश्न उपस्थित केला — “उच्च पदस्थ नोकरशाह म्हणून तुम्ही यावर कारवाई करणार आहात की नाही?”‎‎

निवडणूक आयोगावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. २ डिसेंबरला होणारी निवडणूक पुढे ढकलून २० डिसेंबरला नेण्यात आली, यामागेही राजकीय हेतू असल्याचा आरोप त्यांनी केला. “तडकाफडकी निवडणुका पुढे-मागे करणे, एकत्र घेणे किंवा उशिरा जाहीर करणे — हे सामान्य उमेदवारांनी निवडणूक लढवूच नये किंवा उभे राहिले तरी पराभूत व्हावेत, अशा प्रकारची यंत्रणा भाजप उभी करत आहे,” असे ते म्हणाले.‎‎

निवडणुका या सहज राहिलेल्या नाहीत. पैसा, ताकत असलेले लोकचं सत्तेत जातील आणि जे सत्तेबाहेर आहेत ते कायमच सत्तेबाहेर राहतील, यासाठी भाजपाने व्यवस्था निर्माण केली आहे.‎‎प्रेस क्लब, महाराजबाग रोड येथे पार पडलेल्या या पत्रकार परिषदेत मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.

Tags: AgricultureElectionFarmerMaharashtranagpurpoliticsPrakash AmbedkarrssSujat AmbedkarVanchit Bahujan Aghadivbaforindia
Previous Post

बुलढाणा जाहीर सभा : सुजात आंबेडकर यांच्या प्रचार दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा -ॲड. प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याला यश ! मुंबईतील ५ हजार ४५३ झोपड्यांवरील कारवाई स्थगित; पुनर्वसन होईपर्यंत घरे पाडणार नाही
बातमी

वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याला यश ! मुंबईतील ५ हजार ४५३ झोपड्यांवरील कारवाई स्थगित; पुनर्वसन होईपर्यंत घरे पाडणार नाही

by Akash Shelar
November 5, 2026
0

मुंबई : मुंबईतील कुर्ला, चेंबूर आणि ट्रॉम्बे परिसरात रेल्वे मार्गालगत असलेल्या ५ हजार ४५३ झोपड्यांवरील प्रस्तावित कारवाईला स्थगिती मिळाली आहे....

Read moreDetails
यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!

यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!

November 5, 2026
दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

November 5, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा दणका आणि अमेरिकेच्या जागतिक धोरणांचे वास्तव

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा दणका आणि अमेरिकेच्या जागतिक धोरणांचे वास्तव

November 5, 2026
अकोट: स्मार्ट मीटरची स्वयंचलित वीज खंडित प्रणाली तात्काळ बंद करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

अकोट: स्मार्ट मीटरची स्वयंचलित वीज खंडित प्रणाली तात्काळ बंद करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

November 5, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home