Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

चर्चा दौरा : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विजयाचा निर्धार; ‘वंचितांना न्याय’ देणार – सुजात आंबेडकर

mosami kewat by mosami kewat
October 16, 2025
in बातमी, राजकीय, संपादकीय
0
चर्चा दौरा : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विजयाचा निर्धार; ‘वंचितांना न्याय’ देणार – सुजात आंबेडकर
       
मुर्तिजापूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजयाचा निर्धार करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने अकोला जिल्ह्यात ‘चर्चा दौरा’ सुरू केला आहे. याच दौऱ्याअंतर्गत मुर्तिजापूर येथे पक्षाचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली चर्चा आणि मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते. निवडणूक प्रचार यंत्रणेचा प्रभावी वापर करण्यावर आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्य तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यावर या चर्चा दौऱ्यात भर देण्यात आला.

यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना युवा नेते सुजात आंबेडकर म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या तळागाळातील कार्यकर्त्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. वंचित बहुजन आघाडी हा पक्ष वंचित समूहांना सत्तेत स्थान मिळवून देण्यासाठीच स्थापन झाला आहे.

ते पुढे म्हणाले, ज्या जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपंचायत आणि पंचायत समित्यांची दारे वंचित समूहांसाठी पूर्वी बंद होती, त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने या समाजातील घटकांना थेट सत्तेत पोहोचवले. यामुळे या प्रतिनिधींच्या माध्यमातून समाजाला न्याय मिळवून देण्याची एक मोठी संधी पक्षाने उपलब्ध करून दिली आहे.

प्रस्थापित व्यवस्थेचे आव्हान स्वीकारून वंचित, बहुजन आणि शोषितांना सत्तेत पोहोचवण्याची एक नवी व्यवस्था वंचित बहुजन आघाडीने निर्माण केली आहे, असे मत सुजात आंबेडकर यांनी या चर्चा दौऱ्यात व्यक्त केले.

यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष आम्रपाली खंडारे, युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, महासचिव राजकुमार दामोदर यांच्यासह अकोला जिल्ह्यातील पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: AgricultureAkolaFarmerJusticeMaharashtrapoliticsSujat AmbedkarVanchit Bahujan Aghadivbaforindia
Previous Post

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचा एल्गार; युवा नेते सुजात आंबेडकरांचा बार्शिटाकळीत चर्चा दौरा

Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह, चेंबूर – विद्यार्थ्यांवरील अन्याय थांबवला!

Next Post
डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह, चेंबूर – विद्यार्थ्यांवरील अन्याय थांबवला!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह, चेंबूर – विद्यार्थ्यांवरील अन्याय थांबवला!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मनमाड नगरपरिषदेच्या जनहितविरोधी ठरावाविरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन 
बातमी

मनमाड नगरपरिषदेच्या जनहितविरोधी ठरावाविरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन 

by mosami kewat
June 24, 2026
0

मनमाड : मनमाड नगरपरिषद हद्दीतील 'आय.यु.डी.पी.' (IUDP) साईट क्र. १८ येथील जागा गोरगरीब व बहुजन समाजातील मुलांच्या मनोरंजनासाठी 'सार्वजनिक गार्डन'...

Read moreDetails
स्वाधार योजनेतील एटीकेटीची जाचक अट रद्द करण्याची मागणी; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवेदन

स्वाधार योजनेतील एटीकेटीची जाचक अट रद्द करण्याची मागणी; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवेदन

June 24, 2026
औरंगाबादमध्ये “प्रबुद्ध भारत” मीडिया हाऊसच्या कार्यालयाचे उद्घाटन

औरंगाबादमध्ये “प्रबुद्ध भारत” मीडिया हाऊसच्या कार्यालयाचे उद्घाटन

June 24, 2026
शहीद सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची राज्य मानवी हक्क आयोगात सुनावणी; पुढील सुनावणी १ जुलै रोजी

शहीद सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची राज्य मानवी हक्क आयोगात सुनावणी; पुढील सुनावणी १ जुलै रोजी

June 24, 2026
मुस्लिम बांधवांच्या दफनभूमीच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडी आक्रमक; आयुक्तांना दिले निवेदन

मुस्लिम बांधवांच्या दफनभूमीच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडी आक्रमक; आयुक्तांना दिले निवेदन

June 24, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home