Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

शासनाच्या पारधी पॅकेज योजनेतील एजंटगिरी थांबवा, अमरावती वंचितची मागणी

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 3, 2025
in बातमी
0
शासनाच्या पारधी पॅकेज योजनेतील एजंटगिरी थांबवा, अमरावती वंचितची मागणी
       

अमरावती – महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी, पारधी, फासेपारधी या समूहाच्या उत्थानासाठी असलेल्या विविध योजना आदिवासी विकास विभागाच्यावतीने राबविण्यात येतात. परंतु या विभागात एजंटांचा प्रचंड सुळसुळाट झाला असून विकासाच्या योजना पूर्णपणे थेट लाभार्थ्यापर्यंत पोहचत नाहीत. त्यामुळे पारधी पॅकेज योजनेतील एजंटगिरी त्वरीत थांबविण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्तांकडे केली आहे.

आदिवासी, पारधी, फासेपारधी समूहातील कुटुंबाचे जीवनमान उंचावून त्यांना रोजगाराच्या संधी देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येतात. मात्र या योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहचत नाही. यामध्ये एजंट व प्रशासनातील अधिकारी हे संगनमत करून योजनेतील केवळ काहीच टक्के लाभ लाभार्थ्यांना देत असल्याच्या तक्रारारी वंचित बहुजन आघाडीकडे नागरिकांनी केल्या आहेत. महाराष्ट्र शासनाच्या पारधी पॅकेज अंतर्गत पारधी समूहाला मिळणाऱ्या अनुदानात प्रचंड गैरव्यवहार होत आहे. तसेच यामध्ये पारधी समाजातील गरीब व वंचित समाज बांधवांच्या अज्ञानाचा गैर फायदा समाजातील प्रस्थापित लोकांकडून व प्रशासनातील अधिकारीवर्गाकडून घेतला जात असल्याचा आरोप वंचितने केला आहे. फळबाग लागवड, विहिरी, घरकुल, गुरे व शेळी वाटप, इ रिक्षा, ट्रॅक्टर वाटप, या योजनांची चौकशी झाल्यास मोठा भ्रष्टाचार उघड होण्याची शक्यता आहे. तेव्हा पारधी पॅकेज अंतर्गत योजनांमधील एजंटगिरी थांबवून योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांना देण्यात यावा. एजंटगिरीचा प्रकार न थांबल्यास वंचित स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.

यावेळी वंचितचे अमरावती जिल्हाध्यक्ष (पूर्व) राहुल मेश्राम, युवा आघाडी जिल्हा महासचिव सागर भवते, जिल्हा सदस्य प्रशांत गजभिये, शहर उपाध्यक्ष शैलेश बागडे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष अजय तायडे, तिवसा तालुका अध्यक्ष सचिन जोगे, भारत दहाट, रोषन पवार, अभिषेक भोसले यांच्यासह मोठ्या संखेने वंचितचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


       
Tags: agencydemandgovernmentpackagePardhipeopleschemeStop
Previous Post

2025 च्या आयपीएलचा आज फायनल; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्ध पंजाब किंग्ज पहिल्यांदाच विजेतेपदासाठी भिडणार

Next Post

सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत सम्यकचा ठाण्यात फुले आंबेडकर उत्सव सोहळा

Next Post
सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत सम्यकचा ठाण्यात फुले आंबेडकर उत्सव सोहळा

सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत सम्यकचा ठाण्यात फुले आंबेडकर उत्सव सोहळा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
GST परिषदेच्या निर्णयानंतर सोन्याच्या किमतीत मोठा उलटफेर; झपाट्याने बदलले दर, जाणून घ्या आजचे दर
बातमी

GST परिषदेच्या निर्णयानंतर सोन्याच्या किमतीत मोठा उलटफेर; झपाट्याने बदलले दर, जाणून घ्या आजचे दर

by mosami kewat
September 6, 2025
0

सोन्याच्या दरांनी सध्या उच्चांक गाठला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव सातत्याने वाढत असून त्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होत...

Read moreDetails
अजित पवारांची अरेरावी ; महिला अधिकाऱ्यावरच चौकशीचा डाव !

अजित पवारांची अरेरावी ; महिला अधिकाऱ्यावरच चौकशीचा डाव !

September 5, 2025
वंचित बहुजन आघाडीची भव्य बैठक उत्साहात पार पडली

वंचित बहुजन आघाडीची भव्य बैठक उत्साहात पार पडली

September 5, 2025
जिल्हा शिल्यचिकित्सकांच्या तोंडाला काळे फासण्याचा वंचित बहुजन आघाडीचा  इशारा

जिल्हा शिल्यचिकित्सकांच्या तोंडाला काळे फासण्याचा वंचित बहुजन आघाडीचा इशारा

September 5, 2025
वडार समाजाकडून बाळासाहेब आंबेडकर यांचा आभार सोहळा!

वडार समाजाकडून बाळासाहेब आंबेडकर यांचा आभार सोहळा!

September 5, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home