‘लाडकी बहीण’साठी सामाजिक न्याय विभागाला पुन्हा फटका, 410 कोटींचा निधी वळवला
मुंबई – सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गत विधानसभा निवडणुकी आधी सुरु केली होती. गेल्या वर्षी पासून ही योजना सुरु असू्न तेव्हां पासून या लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रूपये सरकार देत आहे. मात्र यंदा हा निधी देण्यासाठी फडणवीस सरकारकडून इतर विभागांच्या निधीला कात्री लावण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहीणींचा फटका आता आदीवासी विभाग व सामाजिक न्याय विभागाला बसतो आहे. आतापर्यंत दोन्ही विभागांचा मिळुन तब्बल 1,827 कोटी रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी महिला आणि बालकल्याण विभागाकडे वळवण्यात आला आहे.
लाडक्या बहिणींसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी पुन्हा एकदा वळवण्यात आला असून या विभागाचा अनुसूचित जाती घटकांसाठीचा 410.30 कोटींचा निधी वळवण्यात आला आहे. तर दुसरीकडे आदिवासी विभागाचा देखील तब्बल 335 कोटी 70 लाख रुपायांचा निधी लाडक्या बहीणीसांठी वळव्य़ात आला आहे. अशा प्रकारे आत्ता पर्यंत आदीवासी विभागाचा तीन वेळा निधी लाडक्या बहीण योजनेसाठी महिला व बालकल्याण विभागालाा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे गेल्या 5 वर्षाच्य तुलनेत यंदा सामाजिक न्याय विभागाला तब्बल 7,317 कोटी रुपयांचा कमी निधी मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गेल्या वर्षभरात आदीवासी विभाग आणि सामाजिक न्याय विभागाचा मिळुन तब्बल 1827 कोटी 70 लाख निधी हा लाडक्या बहीणींसाठी देण्यात आला आहे. यावरून देवेंद्र फडणवीस सरकारवर जोरदार टिका होऊ लागली आहे.