Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात, विमानात २४२ प्रवासी

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 12, 2025
in बातमी
0
अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात, विमानात २४२ प्रवासी
       
अहमदाबाद | प्रतिनिधी

गुजरातमधील अहमदाबाद येथे गुरुवारी एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात झाला आहे. लंडनकडे जाणाऱ्या AI 171 या विमानात २४२ प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्स होते. टेकऑफदरम्यान विमानाचा मागचा भाग एका झाडाला धडकल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा अपघात अहमदाबाद येथील हॉर्स कॅम्प परिसरात, सिव्हिल हॉस्पिटलच्या जवळ झाला. अपघातानंतर परिसरात काळ्या धुराचे लोट उठताना दिसले. विमान मेघाणी नगर परिसरातून धावपट्टी २३ वरून उड्डाण केले होते. त्यानंतर काही क्षणांतच ते जमिनीवर कोसळले.

या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी हेही प्रवास करत होते. घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गृहमंत्री व डीजीपी यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली. एनएसजी आणि एनडीआरएफच्या टीम घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. यावर एअर इंडियाचे स्पष्टीकरण आले आहे. एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, AI171 विमानाला टेकऑफदरम्यान अपघात झाला असून आम्ही घटनेची माहिती गोळा करत आहोत. अधिकृत माहिती लवकरच Air India च्या वेबसाइट आणि सोशल मीडिया हँडल्सवर शेअर करण्यात येईल. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या अपघाताबाबत तीव्र दुःख व्यक्त करत तात्काळ बचाव आणि वैद्यकीय मदतीचे आदेश दिले आहेत. जखमी प्रवाशांसाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करून उपचारासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

Tags: 242 passengersAhmedabadAir Indiaboardcrashesplane
Previous Post

आता आधार असेल तरच रेल्वेच तात्काळ तिकिट – रेल्वेचा निर्णय

Next Post

राज्यातील महापालिका निवडणुका आक्टोंबरमध्ये? प्रभाग रचनेसाठी 3 महिन्यांचा कालावधी लागणार

Next Post
राज्यातील महापालिका निवडणुका आक्टोंबरमध्ये? प्रभाग रचनेसाठी 3 महिन्यांचा कालावधी लागणार

राज्यातील महापालिका निवडणुका आक्टोंबरमध्ये? प्रभाग रचनेसाठी 3 महिन्यांचा कालावधी लागणार

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home