Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

राज्यात 13 जूनपासून मान्सून पुन्हा सक्रीय होणार

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 9, 2025
in बातमी
0
राज्यात 13 जूनपासून मान्सून पुन्हा सक्रीय होणार
       

मुंबई – हवामान विभागाने महत्वाची माहिती दिली असून राज्यात 13 जूनपासून मान्सून पुन्हा सक्रीय होणार असल्याचं सांगितलं आहे. तसेच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये 9 आणि 10 जून रोजी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. कोकण-गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याचे सांगितले आहे.हवामान विभागाने काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. यामध्ये पश्चिम घाट विभागात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

गेल्या 100 वर्षात पडला नाही, येवढा मोठ्या प्रमाणात पाऊस यंदा एकट्या 2025 च्या मे महिन्यात पडला. मात्र त्यानंतर जूनच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये मान्सून राज्यातून गायब झाला आहे. यंदा राज्यात मे महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. या वर्षी 26 मे रोजी वेळेआधी 15 दिवस मान्सून राज्यात दाखल झाला होता. मात्र मान्सूनने जून महिन्यातील पहिल्या दहा दिवस थोडी विश्रांती घेतल्याचे पहायला मिळाले. सध्या राज्यातील शेतकरी मान्सून सक्रीय कधी होणार याची आतुरतेने वाट पाहात आहेत. तर दुसरीकडे मान्सून अभावी राज्यातील सर्वच पिकांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. राज्यात उत्तर महाराष्ट्र अन् विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अद्याप मान्सून दाखल झालेला नाही. त्यामुळे राज्यातील सर्व विभागातील शेतकरी मान्सूनच्या प्रतिक्षेत आहेत.


       
Tags: activeagainJune 13MaharashtraMonsoonstate
Previous Post

डिसेंबर 2025 अखेरपर्यंत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात सौर ऊर्जेचा वापर

Next Post

मुंबईतील रेल्वे अपघाताची घटना अत्यंत दुःखद आणि मन हेलावणारी – अॅड. प्रकाश आंबेडकर

Next Post
मुंबईतील रेल्वे अपघाताची घटना अत्यंत दुःखद आणि मन हेलावणारी – अॅड. प्रकाश आंबेडकर

मुंबईतील रेल्वे अपघाताची घटना अत्यंत दुःखद आणि मन हेलावणारी - अॅड. प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
…ते ‘वंचित’ने करून दाखवले! प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसलाही सल्ला
बातमी

…ते ‘वंचित’ने करून दाखवले! प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसलाही सल्ला

by mosami kewat
March 3, 2026
0

पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या तालावर मुजरा करतायत : प्रकाश आंबेडकर मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी...

Read moreDetails
अमेरिकेसोबतचा व्यापार करार देशहितविरोधी – ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

अमेरिकेसोबतचा व्यापार करार देशहितविरोधी – ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

March 2, 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी एपस्टिनचे संबंध होते; जनतेने, मीडियाने सरकारला याचा जाब विचारावा – सुजात आंबेडकर 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी एपस्टिनचे संबंध होते; जनतेने, मीडियाने सरकारला याचा जाब विचारावा – सुजात आंबेडकर 

March 2, 2026
‘मोदी हटाव, देश बचाव’; एपस्टीन फाइल्स आणि व्यापार धोरणावरून वंचित बहुजन आघाडीचे मुंबईत ‘महाआंदोलन’

‘मोदी हटाव, देश बचाव’; एपस्टीन फाइल्स आणि व्यापार धोरणावरून वंचित बहुजन आघाडीचे मुंबईत ‘महाआंदोलन’

March 2, 2026
Mumbai Pollution : मुंबईत पुन्हा वाढता प्रदूषणाचा धोका; पवईत सर्वाधिक एक्यूआय

Mumbai Pollution : मुंबईत पुन्हा वाढता प्रदूषणाचा धोका; पवईत सर्वाधिक एक्यूआय

March 2, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home