पुणे – शहरात सुरु असलेल्या पावसाळ्याच्या तडाख्याने दोन दुर्दैवी घटना घडल्या असून, यामुळे प्रशासनाच्या पावसाळी तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. कोल्हापूरहून पुण्यात आलेली एक महिला नवले पुलाजवळ रिक्षा पकडत असताना मुसळधार पावसामुळे अचानक वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. ही घटना शहरवासीयांच्या हृदयाचा ठाव घेणारी ठरली आहे. दोन दिवसांच्या शोधमोहीमेनंतर तिचा मृतदेह वारजे भागातून सापडला. या घटनेमुळे पुण्यातील नाले, जलनियंत्रण यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरु झाली आहे. या घटनेच्या धक्क्यातून शहर सावरत असतानाच, पानशेत धरण परिसरात एक मुलगा पाण्यात बुडून मृत झाला आहे. या दोन्ही घटना पावसाळ्याच्या सुरुवातीलाच घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. नागरिकांनी पावसाळ्यात अत्यंत सावधगिरी बाळगावी, सार्वजनिक वाहतूक व जलस्रोताजवळ विनाकारण जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
OBC क्रिमी लेयर ठरवताना केवळ पालकांचे उत्पन्न निकष ठरणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय !
नवी दिल्ली : ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय दिला आहे. एखादा उमेदवार क्रिमी लेयरमध्ये...
Read moreDetails






