Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वरळी बीडीडी चाळ परिसरात आंबेडकर जयंतीवेळी तणाव; चर्चेनंतर मार्ग काढला

mosami kewat by mosami kewat
April 15, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक
0
वरळी बीडीडी चाळ परिसरात आंबेडकर जयंतीवेळी तणाव; चर्चेनंतर मार्ग काढला
       
मुंबई : दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वरळी येथील बीडीडी चाळ परिसरात पोलिसांनी साऊंड सिस्टम बंद करण्यास सुरुवात केल्याने वातावरण तणावपूर्ण झाले. नागरिकांनी वारंवार विनंती करूनही पोलिसांनी कारवाई सुरू ठेवल्यामुळे जयंतीच्या उत्साहात अडथळा निर्माण झाला.

या घटनेच्या निषेधार्थ स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरले. वरळीतील जांबोरी मैदान येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केले. जयंती साजरी करण्यावर निर्बंध घालण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी व्यक्त केली.

घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेश कार्यकारिणी सदस्य आकाश अशोक दोडके, मुंबई प्रदेश उपाध्यक्ष राकेश बुवा कांबळे, वरळी तालुका समन्वयक राज सावंत, मोहम्मद नबी शेख, सुरेश यादव, निर्भय माने, युवा आघाडी महासचिव दिप्ती गोडबोले, तसेच आकाश दोडके आणि इतर पदाधिकारी यांनी अतिरिक्त पोलिस आयुक्त विक्रम देशमाने, उपायुक्त झोन ३ उपाध्याय आणि एसीपी शालिनी शर्मा यांच्याशी चर्चा केली.

स्थानिक रहिवासी व आंबेडकरी अनुयायांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेनंतर पोलिस प्रशासनाने जयंती साजरी करताना कोणतेही अडथळे निर्माण न करण्याचे मौखिक आश्वासन दिले. तसेच १४, १५ आणि १६ एप्रिल या कालावधीत नागरिकांनी शांततेत आणि उत्साहात जयंती साजरी करावी, असेही सांगण्यात आले.

यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले असून नागरिकांनी आनंदाने आपल्या राहत्या ठिकाणी परतत जयंती उत्साहात साजरी करण्यास सुरुवात केली आहे.

Tags: Bhim jayantiDr Babasaheb AmbedkarDr. B.R. AmbedkarDr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026MaharashtrapolicePoliticalVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती वर वैचारिक ‘कंट्रोल’ आणण्याचा भाजप संघाचा डाव!

Next Post

जालन्यात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भव्य कार्यक्रम संपन्न!

Next Post
जालन्यात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भव्य कार्यक्रम संपन्न!

जालन्यात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भव्य कार्यक्रम संपन्न!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home