Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करणार!

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 17, 2024
in बातमी, राजकीय
0
विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करणार!
       

वंचित बहुजन आघाडीच्या आत्मचिंतन बैठकीत निर्धार

मुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर वंचित बहुजन आघाडीची राज्य कार्यकारिणी बैठक लोणावळा येथे पार पडली. महाविकास आघाडीसोबत युती न झाल्याने १८ व्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या विरोधात लढण्याची वेळ वंचित बहुजन आघाडीवर आली. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाची कारणे आणि त्यावरील उपाय यावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

संविधान वाचवण्यासाठी सामाजिक आणि राजकीय लढा, जो वंचित बहुजन आघाडीने सुरू केला होता, तो मुद्दा काँग्रेस आणि त्याच्या मित्रपक्षांनी हायजॅक केला. त्यामुळे अनेक समुदायांनी मोठ्या प्रमाणात काँग्रेसला पाठिंबा दिला. आम्हीही भाजप आणि त्यांच्या धोरणांच्या विरोधात उभे आहोत हे सांगण्यात आम्ही कमी पडलो. आम्ही जनतेला हे सांगण्यास अयशस्वी झालो की, जर तुम्ही वंचित बहुजन आघाडीला मत दिले, तर आम्ही भाजपच्या विरोधात इतरांपेक्षा जास्त चांगले काम करू. कारण, हा लढा आम्ही सुरू केला आहे आणि आम्ही कोणत्याही जानवेधारी नेतृत्वाला उत्तर देण्यासाठी बांधील नाही.

आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष दमदार कामगिरी करेल असा निर्धार यावेळी करण्यात आला. पक्षाचे निष्ठावंत मतदार हे आजही पक्षासोबत आहेत. त्यांच्याशी पुन्हा संवाद साधण्यात येईल. आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीचा विस्तार करू आणि आमची संघटनात्मक बांधणी मजबूत करू. पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा मतदान करणाऱ्या नव मतदारांशी संवाद साधण्यासाठी अभियान राबवण्यात येईल असा निर्णय यावेळी घेण्यात आला. लोकसभा निवडणुकीतील पराभवाने खचून न जाता फुले – शाहू – आंबेडकरी राजकारण प्रस्थापित करण्यासाठी आणि वंचित बहुजनांच्या हाती सत्ता देण्यासाठी पुन्हा नव्या ताकतीने मैदानात उतरू असा संकल्प यावेळी करण्यात आला.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्यासह संपूर्ण राज्य कार्यकारिणी पदाधिकारी उपस्थित होते.


       
Tags: MaharashtrapoliticsPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

इथं सत्ता कधी तुमच्या घरी पाणी भरत होती ?जी गमावल्याचे दुःख तुम्ही मानत आहात ?

Next Post

कार्यकर्त्याला पाय धुवायला लावणे हेनाना पटोलेंच्या सरंजामी वृत्तीचे दर्शन

Next Post
कार्यकर्त्याला पाय धुवायला लावणे हेनाना पटोलेंच्या सरंजामी वृत्तीचे दर्शन

कार्यकर्त्याला पाय धुवायला लावणे हेनाना पटोलेंच्या सरंजामी वृत्तीचे दर्शन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मुंबई महानगरपालिका निवडणूक: वॉर्ड १३९ मधून स्नेहल सोहनी यांचा उमेदवारी अर्ज दाखल
बातमी

मुंबई महानगरपालिका निवडणूक: वॉर्ड १३९ मधून स्नेहल सोहनी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

by mosami kewat
December 30, 2025
0

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आज वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस युतीच्या अधिकृत उमेदवार स्नेहल सोहनी यांनी आपला उमेदवारी...

Read moreDetails
बीड अत्याचार प्रकरण :  सहआरोपींना तात्काळ अटक करा, अन्यथा राज्यभर आंदोलन; वंचित बहुजन आघाडीचा पोलिसांना इशारा

बीड अत्याचार प्रकरण :  सहआरोपींना तात्काळ अटक करा, अन्यथा राज्यभर आंदोलन; वंचित बहुजन आघाडीचा पोलिसांना इशारा

December 30, 2025
बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026: वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस युतीचे उमेदवार अर्ज दाखल

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026: वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस युतीचे उमेदवार अर्ज दाखल

December 30, 2025
‘वंचित’कडून शाहीर मेघानंद जाधव यांना निवडणुकीच्या रिंगणात संधी; प्रभाग ३ मधून डॉ. करुणा जाधव यांना उमेदवारी

‘वंचित’कडून शाहीर मेघानंद जाधव यांना निवडणुकीच्या रिंगणात संधी; प्रभाग ३ मधून डॉ. करुणा जाधव यांना उमेदवारी

December 30, 2025
महानगरपालिका निवडणूक २०२६: प्रभाग २४ आणि २० मधून वंचितचे सतीश गायकवाड, सुनील भुईगळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल!

महानगरपालिका निवडणूक २०२६: प्रभाग २४ आणि २० मधून वंचितचे सतीश गायकवाड, सुनील भुईगळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल!

December 30, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home