Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Dr. Yasmin Shaikh : मराठी भाषा आणि व्याकरणतज्ज्ञ डॉ. यास्मिन शेख यांचे निधन; वयाच्या १०१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

mosami kewat by mosami kewat
August 24, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
Dr. Yasmin Shaikh : मराठी भाषा आणि व्याकरणतज्ज्ञ डॉ. यास्मिन शेख यांचे निधन; वयाच्या १०१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Dr. Yasmin Shaikh : मराठी भाषा आणि व्याकरणतज्ज्ञ डॉ. यास्मिन शेख यांचे निधन; वयाच्या १०१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

       

पुणे : मराठी भाषा आणि व्याकरणाच्या क्षेत्रात प्रदीर्घ काळ मोलाचे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. यास्मिन शेख यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या १०१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुली डॉ. शमा आणि प्रा. रुकसाना असा परिवार आहे.

मराठी भाषेतील प्रमाणभाषेच्या वापरासाठी आयुष्यभर आग्रही राहिलेल्या डॉ. शेख यांनी भाषाशास्त्र आणि व्याकरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. तसेच मराठी बोलताना परकीय शब्दांचा अनावश्यक वापर टाळला पाहिजे आणि ललित तसेच वैचारिक लेखनात प्रमाण भाषेचा वापर झाला पाहिजे, अशी त्यांची ठाम भूमिका होती. भाषा हा समाजाचा आणि संस्कृतीचा महत्त्वाचा वारसा आहे तो जपणे आणि समृद्ध करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असा संदेश त्यांनी सातत्याने दिला. (Dr. Yasmin Shaikh Passes Away)

Also Read : महाविद्यालयाच्या परिसरात RSS कार्यक्रमास विरोध; वंचित बहुजन आघाडीचे पोलिसांना निवेदन

ज्यू कुटुंबात जन्मलेल्या डॉ. यास्मिन शेख यांचे पूर्वाश्रमीचे नाव जेरुषा रुबेन होते. ज्येष्ठ साहित्यिक-नाटककार वसंत कानेटकर यांच्या पुढाकारातून त्यांची नाशिकमध्ये अझीझ अहमद इब्राहिम शेख अर्थात ‘डॅडी शेख’ यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर १९५० मध्ये त्यांनी विवाह केला. विवाहानंतर त्यांनी धर्मांतर केले नाही; मात्र जेरुषा रुबेन हे नाव बदलून यास्मिन शेख हे नाव स्वीकारले.

डॉ. यास्मिन शेख ह्या प्रा. श्री. म. माटे यांच्या त्या विद्यार्थिनी होत्या. पुढे श्री. पु. भागवत आणि वसंत कानेटकर यांच्यासोबतही त्यांनी काम केले. शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर तब्बल ३४ वर्षे त्यांनी अध्यापन केले. मुंबईतील सायन येथील एस.आय.ई.एस. महाविद्यालयाच्या मराठी विभागप्रमुख म्हणून सहा वर्षे त्यांनी जबाबदारी सांभाळली.

‘स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ अॅडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर’, मुंबई येथे आयएएसच्या विद्यार्थ्यांना त्यांनी दहा वर्षे व्याकरण आणि भाषाशास्त्र शिकवले. बालभारतीच्या मराठी पाठ्य पुस्तकांच्या संपादन प्रक्रियेत सात वर्षे त्यांनी योगदान दिले. या सोबतच यास्मिन शेख ह्या बालभारतीच्या संशोधन विभागातर्फे प्रसिद्ध झालेल्या ‘कार्यात्मक व्याकरण’ या पुस्तकाच्या निर्मितीतही त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. आणि ‘अंतर्नाद’ मासिकाच्या त्या व्याकरण सल्लागार म्हणून कार्यरत होत्या. (Dr. Yasmin Shaikh Passes Away)

Also Read : मनमाडकरांचा अजंता एक्स्प्रेसच्या विस्ताराला तीव्र विरोध; निर्णय झाल्यास ‘रेल रोको’चा वंचित बहुजन आघाडीचा इशारा

यास्मिन शेख यांच्या मराठी भाषेच्या क्षेत्रातील  उल्लेखनीय कार्याची दखल घेत राज्य शासनाच्या वतीने त्यांना डॉ. अशोक केळकर सन्मान प्रदान करण्यात आला होता. शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलनातही त्यांचा सत्कार करण्यात आला होता. मात्र त्यांच्या, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्या नव्हत्या.

भाषाशास्त्र, व्याकरण आणि प्रमाण मराठीच्या क्षेत्रात आयुष्यभर केलेल्या कार्यामुळे डॉ. यास्मिन शेख यांचे योगदान मराठी भाषा आणि साहित्यविश्वासाठी कायम स्मरणात राहणार आहे.


       
Tags: Dr. Yasmin Shaikh Passes AwayGrammarianMaharashtraMarathi CultureMarathi languageVeteran Marathi Linguist
Previous Post

महाविद्यालयाच्या परिसरात RSS कार्यक्रमास विरोध; वंचित बहुजन आघाडीचे पोलिसांना निवेदन

Next Post

Amravati Hospital Fire : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील तीन नवजात बालकांच्या मृत्यूला राज्याचे भ्रष्ट आरोग्य खाते जबाबदार – राजेंद्र पातोडे

Next Post
Amravati Hospital Fire : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील तीन नवजात बालकांच्या मृत्यूला राज्याचे भ्रष्ट आरोग्य खाते जबाबदार - राजेंद्र पातोडे

Amravati Hospital Fire : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील तीन नवजात बालकांच्या मृत्यूला राज्याचे भ्रष्ट आरोग्य खाते जबाबदार - राजेंद्र पातोडे

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home