Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मनमाडकरांचा अजंता एक्स्प्रेसच्या विस्ताराला तीव्र विरोध; निर्णय झाल्यास ‘रेल रोको’चा वंचित बहुजन आघाडीचा इशारा

mosami kewat by mosami kewat
August 23, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
मनमाडकरांचा अजंता एक्स्प्रेसच्या विस्ताराला तीव्र विरोध; निर्णय झाल्यास ‘रेल रोको’चा वंचित बहुजन आघाडीचा इशारा
       
मनमाड: सिकंदराबाद-मनमाड अजंता एक्स्प्रेसचा विस्तार भुसावळपर्यंत करण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर मनमाडमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पाचोरा-भडगाव ग्राहक सेवा संघाच्या वतीने ही गाडी भुसावळपर्यंत नेण्याची मागणी करण्यात आली असून, या मागणीला वंचित बहुजन आघाडीसह मनमाडकरांनी कडाडून विरोध केला आहे. याबाबत रेल्वे मंत्र्यांच्या नावे मनमाड रेल्वे प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून, गाडी इतरत्र हलवल्यास तीव्र स्वरूपाचे ‘रेल रोको’ आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष विलास आहिरे यांनी दिला आहे.

मनमाडचे महत्त्व कमी करण्याचा डाव?

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, यापूर्वी मनमाड स्थानकावरून सुटणाऱ्या आणि मनमाडकरांच्या हक्काच्या असणाऱ्या गोदावरी एक्स्प्रेस, राज्यराणी एक्स्प्रेस व तपोवन एक्स्प्रेस या गाड्यांचा विस्तार करून त्या इतरत्र हलवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मनमाड रेल्वे जंक्शनचे महत्त्व सातत्याने कमी केले जात असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

विस्ताराने प्रवाशांची गैरसोय होणार अजंता एक्स्प्रेसमुळे मनमाड हे थेट मराठवाडा आणि दक्षिण भारताशी जोडले गेले आहे. येथील नागरिक, व्यापारी, रुग्ण व सर्वसामान्य प्रवाशांना या गाडीचा मोठा फायदा होतो. जर ही गाडी भुसावळपर्यंत वाढवली, तर मनमाडकरांच्या कोट्यातील जागा कमी होऊन प्रवाशांची प्रचंड गैरसोय होईल.

मनमाडकरांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता जर रेल्वे प्रशासनाने अजंता एक्स्प्रेस भुसावळपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला, तर मनमाडमध्ये तीव्र जनआंदोलन उभे केले जाईल आणि उद्भवणाऱ्या परिस्थितीला पूर्णपणे रेल्वे प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. 

या निवेदनाच्या प्रती दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक (GM)  यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. सदर प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिनगारे, जिल्हा नेते दिपक साळवे,महासचिव अमोल केदारे, उपाध्यक्ष निलेश  निकम, सागर गाडे, संघटक सुनील बागुल, खुशाल थोरात आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: Ajanta expressMaharashtraManmadPoliticalVanchit Bahujan Aghadi
Previous Post

सोशल मीडिया कंपन्यांचा “टोबॅको” क्षण !

Next Post

महाविद्यालयाच्या परिसरात RSS कार्यक्रमास विरोध; वंचित बहुजन आघाडीचे पोलिसांना निवेदन

Next Post
महाविद्यालयाच्या परिसरात RSS कार्यक्रमास विरोध; वंचित बहुजन आघाडीचे पोलिसांना निवेदन

महाविद्यालयाच्या परिसरात RSS कार्यक्रमास विरोध; वंचित बहुजन आघाडीचे पोलिसांना निवेदन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 
Uncategorized

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

by mosami kewat
October 3, 2026
0

पुणे : ‘जय महाराष्ट्र’ न्यूज चॅनेलचे पत्रकार निखिल सुक्रे यांच्यावर १ ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्याची वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

Read moreDetails
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026
तरुणांचा राग रस्त्यावर का?

तरुणांचा राग रस्त्यावर का?

October 3, 2026
पत्रकार निखिल सुक्रे यांना मारहाण; ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून पोलिसांना कायद्यानुसार कारवाईची सूचना

पत्रकार निखिल सुक्रे यांना मारहाण; ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून पोलिसांना कायद्यानुसार कारवाईची सूचना

October 3, 2026
हिटलरची पद्धत RSS ने उचलली; सरकारला फुले, आंबेडकर वाद्यांची ताकद बघायची आहे का? -ॲड. प्रकाश आंबेडकरांचा थेट इशारा!

हिटलरची पद्धत RSS ने उचलली; सरकारला फुले, आंबेडकर वाद्यांची ताकद बघायची आहे का? -ॲड. प्रकाश आंबेडकरांचा थेट इशारा!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home