Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अमेरिकेसोबतचा व्यापार करार देशहितविरोधी – ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

mosami kewat by mosami kewat
March 2, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
अमेरिकेसोबतचा व्यापार करार देशहितविरोधी – ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
       

मोदी हटाव, देश बचाव; एपस्टीन फाइल्स,  व्यापार धोरणावरून मुंबईत वंचितचे महाआंदोलन

मुंबई : एपस्टीन फाइल्स आणि अमेरिकेशी सुरू असलेल्या कथित ‘एकतर्फी’ व्यापार धोरणावरून देशातील राजकीय वातावरण तापलेले असताना सोमवारी मुंबईत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाआंदोलन करण्यात आले. हे आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात पार पडले.

आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी “मोदी हटाव, देश बचाव” अशा घोषणाबाजी करत केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला. या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. तसेच मातंग मुक्ती सेनेसह अनेक सामाजिक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. (Prakash ambedkar)

महाआंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख कथितरित्या एपस्टीन फाइल्समध्ये झाल्याचा दावा करत पारदर्शक चौकशीची मागणी करण्यात आली. अमेरिकेशी सुरू असलेल्या व्यापार करारामुळे देशाच्या आर्थिक हितसंबंधांना धक्का बसत असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला. केंद्र सरकारने या मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली.

आंदोलनाला संबोधित करताना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आरएसएस-इस्राईल संबंध, परराष्ट्र धोरण आणि अमेरिकेसोबतचे करार यावर टीका केली. “भारत पुन्हा गुलामगिरीच्या दिशेने जात आहे. अमेरिकेसोबतचा व्यापार करार हा देशाच्या हिताविरोधात आहे,” असा हल्लाबोल त्यांनी केला. तसेच एपस्टीन प्रकरणाबाबत पंतप्रधानांनी खुलासा करावा, अशी मागणी आंबेडकर यांनी केली. (Prakash ambedkar)

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आखाती देशांमध्ये कार्यरत भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त केली. सुमारे दोन कोटींपेक्षा अधिक भारतीय आखाती देशांत कार्यरत असून, आंतरराष्ट्रीय तणाव वाढल्यास त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे ते म्हणाले.

देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या देशासमोर नाचतो त्याचा प्रश्न इथला मीडियाचा मालक विचारत नाही. त्यांना आमचा सवाल आहे, लोकांचा रोष शिगेला पोहोचताना दिसतोय. त्याला तुम्ही दाखवणार आहेत की नाही? असा सवाल उपस्थित केला. (Prakash ambedkar)

देशातील दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचा मुद्दा उपस्थित करत सरकारने जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहनही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

या आंदोलनादरम्यान सीएसएमटी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मुंबईसह उपनगरांतून मोठ्या संख्येने कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. या आंदोलनात रेखा ठाकूर, प्रियदर्शी तेलंग, उत्कर्षा रुपवते, दिशा पिंकी शेख, सुजात आंबेडकर, चेतन अहिरे, स्नेहल सोहनी, सागर गवई, राजेंद्र पाटोडे, नीलेश विश्वकर्मा, अशोक साबळे, कॉ. मिलिंद रानडे, आतिक दफेदार, अविनाश भोसीकर, सचिन गायकवाड यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे प्रमुख पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


       
Tags: americabjpDonald TrumpEpstein fileMaharashtramumbaiMumbai protestnarendra modiPoliticalpoliticsPrakash Ambedkar
Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी एपस्टिनचे संबंध होते; जनतेने, मीडियाने सरकारला याचा जाब विचारावा – सुजात आंबेडकर 

Next Post

…ते ‘वंचित’ने करून दाखवले! प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसलाही सल्ला

Next Post
…ते ‘वंचित’ने करून दाखवले! प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसलाही सल्ला

...ते 'वंचित'ने करून दाखवले! प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसलाही सल्ला

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्याकडून नागपूर येथील संयुक्त मोर्चा स्थळाची पाहणी
बातमी

वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्याकडून नागपूर येथील संयुक्त मोर्चा स्थळाची पाहणी

by mosami kewat
March 22, 2026
0

नागपूर : सुजात आंबेडकर यांनी २३ मार्च रोजी होणाऱ्या आरएसएसविरोधी विशाल जनआक्रोश संयुक्त मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथील मोर्चा स्थळाची पाहणी...

Read moreDetails
ओबीसी चळवळीतील लढवय्या नेता शब्बीर अन्सारी यांचे निधन; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भावपूर्ण आदरांजली

ओबीसी चळवळीतील लढवय्या नेता शब्बीर अन्सारी यांचे निधन; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भावपूर्ण आदरांजली

March 22, 2026
हॅपिनेस इंडेक्स २०२६: स्कॅन्डेनेव्हियन देशांचे यश आणि भारतापुढील आव्हाने

हॅपिनेस इंडेक्स २०२६: स्कॅन्डेनेव्हियन देशांचे यश आणि भारतापुढील आव्हाने

March 21, 2026
२३ मार्चच्या नागपूर मोर्चासाठी वाहनांना टोलमाफी द्या; यवतमाळमध्ये 'वंचित'चे प्रशासनाला निवेदन

२३ मार्चच्या नागपूर मोर्चासाठी वाहनांना टोलमाफी द्या; यवतमाळमध्ये ‘वंचित’चे प्रशासनाला निवेदन

March 21, 2026
२३ मार्चच्या 'आरएसएस' मुख्यालय मोर्चासाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज; अकोला जिल्ह्यात बैठकांचा धडाका

२३ मार्चच्या ‘आरएसएस’ मुख्यालय मोर्चासाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज; अकोला जिल्ह्यात बैठकांचा धडाका

March 21, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home