अकोला : महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडीने अकोला जिल्ह्यात ‘कृषी दिन’ साजरा केला. या निमित्ताने अकोला, तेल्हारा, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी, पातूरसह जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये शेतात जाऊन शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांचा बांधावरच सत्कार करण्यात आला.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांना शाल, टोपी आणि हार घालून सन्मानित करण्यात आले. यासोबतच महानायक वसंतराव नाईक यांचा फोटो भेट म्हणून देण्यात आला.
पातूर तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या शेतात जाऊन जिल्हा आणि तालुका पातळीवरील वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्याचा विशेष सत्कार केला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अनेक जिल्हा आणि तालुका पातळीवरील पदाधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करणे आणि वसंतराव नाईक यांच्या कार्याची आठवण करून देणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
सक्षम ताटे हत्या प्रकरण: पोलीस कारवाईच्या मागणीसाठी आचल ताटे अन् मातेचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न
नांदेड : राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या सक्षम ताटे खून प्रकरणातील संताप आता रस्त्यावर आला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपींच्या अटकेनंतर...
Read moreDetails






