मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज बृहन्मुंबई महानगरपालिकेने बैठक आयोजित केली होती त्यामधे दरवर्षी दादर चैत्यभूमी येथे लाखो आंबेडकरी अनुयायी दाखल होतात. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे स्वप्नील जवळगेकर यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना इशारा देत सांगितले की, “या वेळी आंबेडकरांनी अनुयायांना कोणत्याही प्रकारची गैरसोय सहन केली जाणार नाही. प्रशासनाने योग्य नियोजन करावे.”
यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महानगरपालिकेला लेखी निवेदनही देण्यात आले. या निवेदनात शौचालयांची स्वच्छता, शौचालयांची अपुरी संख्या, निकृष्ट दर्जाचे पाणी व जेवण, तसेच अधिकाऱ्यांचे निष्काळजीपणाचे उत्तर या अनेक मुद्द्यांवर आघाडीने तीव्र आक्षेप घेतला आहे.
बीडमध्ये धाडसी बँक दरोडा! पाली येथील कॅनरा बँकेतून 18.5 लाखांची रोकड लंपास; गॅस कटरचा वापर
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मुंबई अध्यक्ष स्नेहल सोहनी यांनी देखील गंभीर मुद्दे मांडत प्रशासनाला जबाबदार धरण्याची मागणी केली. स्वप्नील जवळगेकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “जर येत्या काळात योग्य नियोजन करण्यात आले नाही, तर वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आधिकारी कर्मचारी यांना ठोकणार अशी ठाम भुमिका मांडली






