लातूर : वंचित बहुजन आघाडीच्या चाकूर तालुका कार्यालयाचे उद्घाटन आज मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष शरद शिनगरे होते.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे लातूर जिल्हा अध्यक्ष सय्यद सलीम, जिल्हा महासचिव रोहित सुमांशी, आणि लातूर तालुका अध्यक्ष सुनील कांबळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना, नवनिर्वाचित कार्यालयामुळे पक्षात एकी निर्माण होऊन पक्ष संघटना मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या उद्घाटन सोहळ्याला तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.