Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मोझरी, कौंडण्यपूरचा वारंवार विकास; भीमटेकडी मात्र उपेक्षित का? तिवसा मतदारसंघात विकासाची अस्पृश्यता कायम असल्याचा सागर भवतेंचा आरोप

mosami kewat by mosami kewat
June 27, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
मोझरी, कौंडण्यपूरचा वारंवार विकास; भीमटेकडी मात्र उपेक्षित का? तिवसा मतदारसंघात विकासाची अस्पृश्यता कायम असल्याचा सागर भवतेंचा आरोप

मोझरी, कौंडण्यपूरचा वारंवार विकास; भीमटेकडी मात्र उपेक्षित का? तिवसा मतदारसंघात विकासाची अस्पृश्यता कायम असल्याचा सागर भवतेंचा आरोप

       

तिवसा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी गुरुकुंज मोझरी, माता रुक्मिणीचे माहेरघर कौंडण्यपूर आणि संत गाडगेबाबा निर्वाणभूमी वलगाव या धार्मिक स्थळांच्या पुनर्विकासासाठी आमदार राजेश वानखडे यांच्या प्रयत्नातून एकूण ७३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, कौंडण्यपूर येथील बौद्ध बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या भीमटेकडीच्या विकासाकडे सातत्याने दुर्लक्ष का केले जाते? असा सवाल वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांनी उपस्थित केला आहे.

तसेच तिवसा मतदारसंघात आजही विकासातील अस्पृश्यता कायम असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सागर भवते यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, २०१४ ते २०१९ या पंचवार्षिक विकास आराखड्यात गुरुकुंज मोझरीच्या विकासासाठी १०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी ७० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. तसेच कौंडण्यपूरच्या विकासासाठी २५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आणि त्या निधीतून विविध विकासकामेही पूर्ण करण्यात आली. (Bhim Tekdi Development)


Also Read : मांगली (गोसाई) गावातील गरीब कुटुंबांना बेघर करण्याचे षड्यंत्र; वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची भेट

आता २०२६ मध्ये पुन्हा वलगाव, मोझरी आणि कौंडण्यपूर येथील देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी ७३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती वृत्तपत्रांतून समोर आली आहे. मात्र, तिवसा मतदारसंघातील नया अकोला येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिभूमी आजही विकासापासून वंचित आहे. तसेच कौंडण्यपूर येथील भीमटेकडीच्या विकासासाठी २०२३ मध्ये केवळ २० लाख रुपयांचे सभागृह मंजूर करून बौद्ध समाजाची बोळवण करण्यात आली, असा आरोप भवते यांनी केला आहे.

सागर भवते म्हणाले की, माजी आमदार यशोमती ठाकूर आणि विद्यमान आमदार राजेश वानखडे यांनी प्रामुख्याने हिंदू धार्मिक स्थळांच्या विकासालाच प्राधान्य दिले असून, त्यामुळे तिवसा मतदारसंघात विकासातील विषमता आणि अस्पृश्यता कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिभूमी, नया अकोला आणि भीमटेकडीच्या विकासाच्या मागणीसाठी लवकरच पत्रकार परिषद घेऊन पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करण्यात येणार असल्याची माहितीही सागर भवते यांनी दिली. (Bhim Tekdi Development)

Also Read : जलशुद्धीकरण केंद्रातील ट्रान्सफॉर्मर तात्काळ दुरुस्त करा; अन्यथा नागरिकांच्या रोषाला प्रशासन जबाबदार राहील : निलेश देव

लोकप्रतिनिधी हे केवळ एका धर्माचे किंवा समाजाचे नसून संपूर्ण मतदारसंघातील सर्व नागरिकांचे प्रतिनिधी असतात. त्यामुळे विकासकामांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव होता कामा नये. तिवसा मतदारसंघात मात्र हिंदू धार्मिक स्थळांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होत असताना बौद्ध समाजाच्या श्रद्धास्थानांकडे दुर्लक्ष केले जात आहे. हा प्रकार अन्यायकारक असून लोकप्रतिनिधींच्या विकासकामांत समानता आणि सामाजिक न्यायाची मूल्ये प्रतिबिंबित झाली पाहिजेत, अशी अपेक्षा सागर भवते यांनी व्यक्त केली.


       
Tags: amravatiBhim Tekdi DevelopmentMaharashtraPoliticalTivsa
Previous Post

मांगली (गोसाई) गावातील गरीब कुटुंबांना बेघर करण्याचे षड्यंत्र; वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची भेट

Next Post

TET पेपरफुटी प्रकरण; शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा – सुजात आंबेडकर

Next Post
TET पेपरफुटी प्रकरण; शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा - सुजात आंबेडकर

TET पेपरफुटी प्रकरण; शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा - सुजात आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Gen Z च्या प्रश्नांना, अपेक्षांना आणि विचारांना समजून घेण्यासाठी थेट संवादाचे विचारपीठ निर्माण करणे आवश्यक आहे – उत्कर्षा रूपवते
बातमी

Gen Z च्या प्रश्नांना, अपेक्षांना आणि विचारांना समजून घेण्यासाठी थेट संवादाचे विचारपीठ निर्माण करणे आवश्यक आहे – उत्कर्षा रूपवते

by mosami kewat
September 17, 2026
0

सुजात आंबेडकर नव्या पिढीशी संवाद साधणार! मुंबई : वंचित बहुजन आघाडीने ‘जय भीम Gen Z’ या नव्या उपक्रमाची घोषणा केली...

Read moreDetails
जय भीम जेन झी! औरंगाबादमध्ये सुजात आंबेडकरांचा भव्य टाऊनहॉल; शेअर केला भन्नाट टीझर, पाहा व्हिडिओ

जय भीम जेन झी! औरंगाबादमध्ये सुजात आंबेडकरांचा भव्य टाऊनहॉल; शेअर केला भन्नाट टीझर, पाहा व्हिडिओ

September 17, 2026
नांदेड: खोब्रागडे नगरमधील बालिकेवरील लैंगिक अत्याचार प्रकरण; संशयित आरोपीला अटक, वंचित बहुजन आघाडी पीडित कुटुंबाच्या पाठीशी

नांदेड: खोब्रागडे नगरमधील बालिकेवरील लैंगिक अत्याचार प्रकरण; संशयित आरोपीला अटक, वंचित बहुजन आघाडी पीडित कुटुंबाच्या पाठीशी

September 17, 2026

नवीन श्रावस्ती नगरातील १५० हून अधिक कुटुंबे बेघर होण्यापासून वाचली; वंचितच्या नगरसेवकांसह सम्यकच्या नेत्यांच्या लढ्याला यश

September 17, 2026
‘राज्य महोत्सव’ विशेषांक प्रकाशन व पुरस्कार प्रदान सोहळा नांदेडमध्ये उत्साहात संपन्न; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

‘राज्य महोत्सव’ विशेषांक प्रकाशन व पुरस्कार प्रदान सोहळा नांदेडमध्ये उत्साहात संपन्न; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

September 17, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home