औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या जनआक्रोश मोर्च्यास उसळला जनसागर !
औरंगाबाद : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्याविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज औरंगाबाद शहरात ‘जन आक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्यात आले होते. शहरातील आरएसएसच्या कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात आला. पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली असतानाही, हजारोंच्या संख्येने नागरिक यात सहभागी झाले आणि मोर्चा यशस्वी झाला.
यावेळी, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर, राज्य समिती सदस्य अमित भुईगळ आणि राज्य समिती सदस्य शमीभा पाटील यांनी थेट पोलीस उपायुक्त (DCP) यांच्याकडे भारतीय संविधान, तिरंगा ध्वज आणि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्टची प्रत सुपूर्द केली.
आरएसएसचा संविधान, तिरंगा स्वीकारण्यास नकार –
RSS च्या कार्यालयात भारताचे संविधान, तिरंगा आणि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्टची प्रत देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे तीन लोकांचे शिष्टमंडळ गेले मात्र, आरएसएसचे कार्यालय बंद होते. मोर्चा येण्याआधीच आरएसएसचे कार्यालय बंद होते.
वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या भूमिकेनंतर आरएसएसने भारतीय संविधान, तिरंगा स्वीकारण्यास नकार देऊन पळ काढला. त्यामुळे, औरंगाबादच्या DCP यांनी हे भारतीय संविधान, तिरंगा ध्वज आणि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्टची प्रत स्वीकारली.
वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने दिली भेट ―
1) सुजात आंबेडकर यांनी भारताचा तिरंगा ध्वज दिला.
2) अमित भुईगळ यांनी भारताचे संविधान दिले.
3) शमीभा पाटील यांनी महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्टची प्रत दिली.
पोलीस उपायुक्त यांनी वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाकडून हे सर्व स्वीकारले.
मोर्चा काढण्याचे कारण ―
वंचित बहुजन आघाडीचे युवा शहर अध्यक्ष राहुल मकासरे आणि आंबेडकरवादी तरुणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. काही दिवसांपूर्वी शहरातील एका महाविद्यालयाच्या परिसरात कुठलीही परवानगी न घेता अनधिकृतपणे आरएसएसची नोंदणी मोहीम सुरू होती. त्या मोहिमेला वंचित बहुजन युवा आघाडीचे शहर अध्यक्ष राहुल मकासरे यांनी विरोध दर्शीवला व तो अनधिकृत स्टॉल हटवला.
या प्रकरणी पोलिसांनी स्वतःहून राहुल मकासरे, विजय वाहुळ आणि इतर लोकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. याविषयी वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेत पोलिसांना नोंदणी नसलेल्या आरएसएस संघटनेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली मात्र, पोलिसांनी ती फेटाळून लावली. त्याचा जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.
मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस फौजफाटा –
सकाळी ११ वाजता क्रांती चौक येथून या ‘जन आक्रोश मोर्चा’ला सुरुवात झाली आहे. मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते हातात फलक घेऊन घोषणाबाजी करत होते. मोर्चात वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कमिटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
उपस्थितांना शपथ –
मोर्चादरम्यान, युवा जिल्हा अध्यक्ष सतीश गायकवाड यांनी उपस्थितांना शपथ दिली. यावेळी सुजात आंबेडकर, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. नितीन ढेपे, अरुंधती शिरसाट, राज्य कमिटी सदस्य अमित भुईगळ, डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, राज्य उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे, फारुख अहमद, नागोराव पांचाळ, शमीभा पाटील, सविता मुंडे, प्रवक्ते तय्यब जफर, जितरत्न पटाईत, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ते प्रशांत बोराडे, युवा आघाडीचे अमोल लांडगे, डॉ. अरुण जाधव, औरंगाबाद युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, जिल्हाध्यक्ष रूपचंद गाडेकर, पंकज बनसोडे, संदीप जाधव यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते. या वेळी उपस्थितांनी ‘भारतीय संविधान जिंदाबाद’, ‘RSS मुर्दाबाद’ अशा जोरदार घोषणा दिल्या.





