Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

‎’संविधान का बदलावे?’ या नावाने पुस्तक प्रकाशित करणाऱ्या लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

mosami kewat by mosami kewat
July 28, 2025
in बातमी
0
‎'संविधान का बदलावे?' या नावाने पुस्तक प्रकाशित करणाऱ्या लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

‎'संविधान का बदलावे?' या नावाने पुस्तक प्रकाशित करणाऱ्या लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

पुणे : अॅड. शिवाजी कोकणे नामक एका व्यक्तीने ‘संविधान का बदलावे?’ या पुस्तकाचे लेखन केले असून त्याचे प्रकाशन पुण्यात ठेवले होते. याविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना निवेदन देत, हे पुस्तक आणि त्याच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
‎
‎वंचित बहुजन आघाडीने आपल्या निवेदनात म्हटले की, शुक्रवार, २६ जुलै २०२५ रोजी नवी पेठ येथील पत्रकार भवन येथे अॅड. शिवाजी कोकणे यांच्या ‘संविधान का बदलावे?’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. हे पुस्तक भारतीय संविधानाचा अपमानास्पद हेतूने अवमान करणारे आहे.
‎
‎संविधानाविषयी अशा प्रकारे चुकीची माहिती लिहिणे, त्याची विक्री करणे आणि प्रचार-प्रसार करणे हा कायद्याने गुन्हा असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
‎
‎याचबरोबर, समाजात तेढ निर्माण करणाऱ्या आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या अशा कार्यक्रमांना पोलीस प्रशासनाने यापुढे परवानगी देऊ नये, अशी मागणीही वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
‎
‎या प्रकरणी, ‘संविधान का बदलावे?’ या पुस्तकाचे लेखक अॅड. शिवाजी कोकणे याच्यासह कार्यक्रमाचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे, सचिन पाटील, बाळासाहेब जमादार (माळवदकर), संजय विठ्ठल जठर, भालचंद्र कुलकर्णी, पराशर मोने, अॅड. रोहन जमादार (माळवदकर) आणि डॉ. श्रीकांत शिवाजीराव शिंदे, सविता कुरूंदवाडे या व्यक्तींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. ही सर्व लोकं त्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून हजर राहणार होती.
‎
‎

Tags: BookConstitutionpunevbaforindia
Previous Post

अकोला: हल्ल्यात जखमी रोहिण पैठणकर यांच्या भेटीसाठी अशोक सोनोने जिल्हा रुग्णालयात, मदतीचे आश्वासन

Next Post

दिव्या देशमुखने पटकावले FIDE महिला विश्वचषक २०२५ चे विजेतेपद!

Next Post
दिव्या देशमुखने पटकावले FIDE महिला विश्वचषक २०२५ चे विजेतेपद!

दिव्या देशमुखने पटकावले FIDE महिला विश्वचषक २०२५ चे विजेतेपद!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वर्धा हिंदी विद्यापीठात दलित, आदिवासी,ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय; ‘एफआयआर आणि कारवाई ब्राह्मणवादी प्रवृत्तीची’ – सुजात आंबेडकर
बातमी

वर्धा हिंदी विद्यापीठात दलित, आदिवासी,ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय; ‘एफआयआर आणि कारवाई ब्राह्मणवादी प्रवृत्तीची’ – सुजात आंबेडकर

by mosami kewat
September 15, 2026
0

मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांशी तातडीने संपर्क साधण्याची मागणी! मुंबई : वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील दलित, आदिवासी...

Read moreDetails
प्रशासकीय कार्यकाळ संपल्यानंतर ग्रामसभा बोलावल्याचा आरोप; माहुली जहागीर पोलिसांना ‘वंचित’चा इशारा

प्रशासकीय कार्यकाळ संपल्यानंतर ग्रामसभा बोलावल्याचा आरोप; माहुली जहागीर पोलिसांना ‘वंचित’चा इशारा

September 15, 2026
चांदवड तालुक्यात वंचित बहुजन आघाडीला बळ; विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

चांदवड तालुक्यात वंचित बहुजन आघाडीला बळ; विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

September 15, 2026
हवामान मोजणारी यंत्रणाच बंद असताना ५५० कोटी खर्चाचा घाट नक्की कुणासाठी ?

हवामान मोजणारी यंत्रणाच बंद असताना ५५० कोटी खर्चाचा घाट नक्की कुणासाठी ?

September 15, 2026
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home