पुणे : अॅड. शिवाजी कोकणे नामक एका व्यक्तीने ‘संविधान का बदलावे?’ या पुस्तकाचे लेखन केले असून त्याचे प्रकाशन पुण्यात ठेवले होते. याविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना निवेदन देत, हे पुस्तक आणि त्याच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
वंचित बहुजन आघाडीने आपल्या निवेदनात म्हटले की, शुक्रवार, २६ जुलै २०२५ रोजी नवी पेठ येथील पत्रकार भवन येथे अॅड. शिवाजी कोकणे यांच्या ‘संविधान का बदलावे?’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. हे पुस्तक भारतीय संविधानाचा अपमानास्पद हेतूने अवमान करणारे आहे.
संविधानाविषयी अशा प्रकारे चुकीची माहिती लिहिणे, त्याची विक्री करणे आणि प्रचार-प्रसार करणे हा कायद्याने गुन्हा असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
याचबरोबर, समाजात तेढ निर्माण करणाऱ्या आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या अशा कार्यक्रमांना पोलीस प्रशासनाने यापुढे परवानगी देऊ नये, अशी मागणीही वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
या प्रकरणी, ‘संविधान का बदलावे?’ या पुस्तकाचे लेखक अॅड. शिवाजी कोकणे याच्यासह कार्यक्रमाचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे, सचिन पाटील, बाळासाहेब जमादार (माळवदकर), संजय विठ्ठल जठर, भालचंद्र कुलकर्णी, पराशर मोने, अॅड. रोहन जमादार (माळवदकर) आणि डॉ. श्रीकांत शिवाजीराव शिंदे, सविता कुरूंदवाडे या व्यक्तींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. ही सर्व लोकं त्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून हजर राहणार होती.
धम्मचक्र प्रवर्तन दिनी अकोल्यात ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे जल्लोषात स्वागत
अकोला : ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य धम्म मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश...
Read moreDetails