सांगली : जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांचा माहोल चांगलाच तापू लागला असून, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी मोठ्या उत्साहात नामनिर्देशन अर्ज दाखल केले. या अर्ज दाखल प्रक्रियेला कार्यकर्ते आणि समर्थकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पलूस नगरपरिषदेसाठी नगराध्यक्ष पदासाठी पुजाताई अमित बनसोडे यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केला.
१) प्रभाग क्र. 1 साठी श्याम अवघडे
२) प्रभाग क्र. 3 साठी अमित बनसोडे
या उमेदवारांनी नगरपालिका विकास, पारदर्शक प्रशासन आणि स्थानिक पातळीवरील जनसामान्यांच्या हिताच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा संकल्प व्यक्त केला. अर्ज दाखल करताना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत उत्साह दाखवला.
याच पार्श्वभूमीवर शिराळा नगरपंचायतीसाठी देखील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर केले.
थेट नगराध्यक्ष पदासाठी निखिल नंदकिशोर कांबळे यांनी अर्ज दाखल केला.वॉर्ड क्र. 12 साठी आकाश कांबळे, वॉर्ड क्र. 16 साठी भाग्यश्री निखिल कांबळे या सर्व उमेदवारांनी शिराळा शहराच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प व्यक्त केला. विशेषत: तरुण नेतृत्वाच्या सहभागामुळे या निवडणुकीत नवी ऊर्जा दिसत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
या सर्व अर्ज दाखल कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश गायगवाळे हे प्रमुख उपस्थित होते. त्यांनी या उमेदवारांना शुभेच्छा देताना “ही निवडणूक जनतेच्या प्रश्नांवर केंद्रित राहावी आणि विकासाचा मार्ग वंचितांच्या हक्कांसाठी खुला व्हावा” असा विश्वास व्यक्त केला.
सांगली जिल्ह्यात VBA च्या या दमदार उमेदवारीमुळे आगामी निवडणुकीत त्रिकोणी लढतीची शक्यता वाढली असून, स्थानिक राजकारणात नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.





