सोलापूर : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या सर्वसमावेशक विचारांना आणि आदिवासी, भटक्या तसेच वंचित समाजाला सत्तेत आणण्याच्या त्यांच्या तळमळीला पाठिंबा देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील जैनापूर शिरवळ येथे वंचित बहुजन आघाडीच्या नवीन शाखेचे उद्घाटन करण्यात आले. हे उद्घाटन सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष चंद्रशेखर मढी खांबे यांच्या उपस्थितीत पार पडले.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मढी खांबे यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, बाळासाहेब आंबेडकर हे बहुजनांच्या चळवळीसाठी आणि त्यांना सत्तेमध्ये बसवण्यासाठी दिवस-रात्र कार्यरत आहेत.
सध्या महाराष्ट्रात जे जाती-धर्माचे राजकारण सुरू आहे आणि सर्व क्षेत्रांमध्ये संविधानाची पायमल्ली होताना दिसत आहे, त्याला आळा घालण्यासाठी सर्वसामान्य आणि सर्व जाती-धर्मांची सत्ता आणणे आवश्यक आहे. वंचितांना सत्तेमध्ये बसवण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा हात बळकट करणे गरजेचे आहे. वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे.
या शाखा उद्घाटनासाठी तालुका अध्यक्ष सुरेश देशमुख आणि शंकर शिंदे यांनी विशेष मेहनत घेतली. त्यांनी गावोगावी फिरून शाखा उभी करण्याचा प्रयत्न केला. तसेच तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि जैनापूर शिरवळ येथील पदाधिकाऱ्यांनीही या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले.
यावेळी जिल्हा महासचिव अनिरुद्ध वाघमारे, भारिप बहुजन महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड, तालुका उपाध्यक्ष धर्मराव बिराजदार, मानतेस सीताफळे, तालुका सहसचिव शिवाजी मंत्रेकर, बापू जंगल भाग, मारुती गोत्र सुर्वे, तालुका संघटक रमेश गायकवाड, तालुका महिला अध्यक्ष सुरेखाताई साबळे, चंद्रकांत वाघमारे, प्रकाश गायकवाड, शाखाध्यक्ष औज उमेश वाघमारे, लक्ष्मीताई सोनकांबळे,
शाखाध्यक्ष रवी भाले, शाखा उपाध्यक्ष चंद्रकांत सोनकांबळे, शाखा महासचिव यल्लाप्पा सोनकांबळे, तसेच युवक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश शिंदे, अक्कलकोट शहराध्यक्ष विशाल ठोंबरे, चपळगाव शाखाध्यक्ष माणिकचंद गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Dhamma Chakra Pravartan Din : सत्ताधारी समाज कायम वंचितांना वंचित ठेवतो – अंजलीताई आंबेडकर
अकोला : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य धम्म मेळाव्याला वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर...
Read moreDetails