वसई-विरार : आगामी १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या वसई विरार महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापले असून, वंचित बहुजन आघाडीने (VBA) आपल्या उमेदवारांची पहिली प्रभागनिहाय यादी जाहीर केली आहे.
महानगरपालिकेच्या एकूण ११५ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने अत्यंत चोख रणनीती आखली आहे. जाहीर करण्यात आलेल्या यादीत समाजातील विविध स्तरांतील प्रतिनिधींना स्थान देण्यात आले आहे. पक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे की, ही यादी स्थानिक प्रश्नांवर काम करणाऱ्या आणि संविधानाच्या रक्षणासाठी कटिबद्ध असलेल्या उमेदवारांची आहे.
“वसई-विरारमध्ये अनेक वर्षांपासून असलेल्या प्रस्थापित सत्ते ला पर्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज झाली आहे.
वसई-विरार महानगरपालिका निवडणूक: उमेदवारांची पहिली ११ प्रभागनिहाय यादी जाहीर झाली आहे. त्यामधील नावे पुढीलप्रमाणे आहेत –
– सुरेश जाधव (मंचेकर), प्रभाग क्रमांक 6 क
– शंकर सुरडकर, प्रभाग क्रमांक 6 ड
– कुसुम जैन, प्रभाग क्रमांक 10 क
– सुरेश केदारे, प्रभाग क्रमांक 11 ड
– गीता जाधव, प्रभाग क्रमांक 18 क
– मेराज शेख, प्रभाग क्रमांक 18 ड
– अमोल घोंगडे, प्रभाग क्रमांक 19 ड
– बुध्दभूषण सावळे, प्रभाग क्रमांक 20 अ
– सुधाकर इंगळे, प्रभाग क्रमांक 21 अ
– संगीता सपकाळ, प्रभाग क्रमांक 26 ब
– शुद्धोधन शिरसाट, प्रभाग क्रमांक 26 क





