नांदेड – विधानपरिषद आमदार हेमंत पाटील यांनी अधिवेशनामध्ये बौद्ध बांधवांना जातीय द्वेषातून अर्बन नक्षली असे संबोधले होते. या वक्तव्यावरून बौद्ध तसेच बहुजन समाजामध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आयटीआय चौक, नांदेड येथे निदर्शने करण्यात आली.
यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश सदस्य अक्षय बनसोडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत इंगोले, युवा जिल्हाध्यक्ष आकाश जोंधळे, महानगराध्यक्ष राहुल सोनसळे, उपाध्यक्ष विशाल एडके, कुलदीप राक्षसमारे, महासचिव शुध्दोधन कापशीकर आदींची उपस्थिती होती.