परभणी : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) खासदार संजय राऊत यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा वंचित बहुजन युवक आघाडीने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.
या निषेधार्थ वंचित बहुजन युवक आघाडी, जिल्हा परभणी यांच्या वतीने परभणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर संतप्त ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान खासदार संजय राऊत यांच्या प्रतीकात्मक छायाचित्राला जोडे मारून कार्यकर्त्यांनी आपला तीव्र रोष व्यक्त केला. (vanchit bahujan aghadi)
आंदोलनाचे नेतृत्व
हे आंदोलन वंचित बहुजन युवक आघाडीचे जिल्हा उत्तर विभाग अध्यक्ष गणेश गाढे यांच्या नेतृत्वाखाली झाले. यावेळी बोलताना गाढे यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर टीका केली. ते म्हणाले, अॅड. बाळासाहेब आंबेडकर हे देशातील वंचित, शोषित आणि बहुजन समाजाचे नेतृत्व करीत आहेत. त्यांच्या वाढत्या प्रभावामुळे घाबरलेल्या काही नेत्यांकडून खालच्या दर्जाची वक्तव्ये करण्यात येत आहेत. आम्ही अशा वक्तव्यांचा तीव्र निषेध करतो आणि समाजाच्या स्वाभिमानावर आघात करणाऱ्यांना जनता योग्य उत्तर देईल. (vanchit bahujan aghadi)
कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित कार्यकर्त्यांनी अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत, समाजाच्या हक्कांसाठी लढा कायम ठेवण्याचा निर्धार केला.
औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य ‘महा आरोग्य शिबीर’ उत्साहात संपन्न!
औरंगाबाद : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रभाग क्र. २४ येथे वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष...
Read moreDetails






