पुणे : वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे कार्यकर्ता संवाद मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्याला कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच यावेळी मेळाव्यात शेकडो महिलांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला.
मेळाव्यादरम्यान अंजलीताई आंबेडकर यांनी पोलिसांच्या कर्तव्यावर भाष्य केले. त्या म्हणाल्या की, येत्या ११ आणि १२ ऑगस्ट रोजी महिला व पुरुष पोलिसांना राखी बांधून त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणार आहोत. पोलिसांकडून महिलांचा सन्मान होत नाही, त्यांना मारहाण केली जाते, त्यांच्या फोनची तपासणी केली जाते आणि सार्वजनिक ठिकाणी घटना घडली नसल्याचे कारण देत एफआयआर दाखल केला जात नाही, असे प्रकार घडत आहेत. हे योग्य नाही.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, आज पोलिसांना केवळ भाऊ म्हणून नाही, तर नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी सांभाळणारे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांच्या कर्तव्याची आठवण करून देण्याची वेळ आली आहे. एक अबला म्हणून नाही, तर एक नागरिक म्हणून आम्ही त्यांना सांगत आहोत की ते त्यांच्या कर्तव्यात कमी पडत आहेत. त्यामुळेच रक्षाबंधनाच्या निमित्ताने पोलिसांना राखी बांधून त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली जाईल.
या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, अरुंधतीताई शिरसाठ, आणि रोहिनीताई टेकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ता उपस्थित होते.
मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमराव आंबेडकर यांनी आजोबांच्या शाळेला दिली भेट
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवाने, डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर यांनी नुकतीच त्यांच्या आजोबांच्या शाळेला, म्हणजेच मुंबईतील एल्फिन्स्टन हायस्कूलला...
Read moreDetails