अमरावती : राज्यात महिला आणि तरुणींना योग्य न्याय मिळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर, वंचित बहुजन महिला आघाडीने पोलिसांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी एक अनोखा उपक्रम राबवला. वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, तिवसा येथील महिला आघाडीच्या सदस्यांनी पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कार आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांना राखी बांधली.
वंचित बहुजन महिला आघाडीच्या सदस्यांनी यावेळी सांगितले की, समाजामध्ये काही वेळा रक्षकच भक्षक बनतात असा अनुभव येतो. त्यांनी नुकत्याच पुण्यात घडलेल्या एका घटनेचा संदर्भ देत, पोलिसांनी आपली जबाबदारी न्यायपूर्वक पार पाडावी अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी महिलांनी पोलिसांसमोर एक पत्र वाचून दाखवले.
यामध्ये भारतीय संविधानाने दिलेल्या स्त्री-पुरुष समानतेच्या तत्त्वाचा आदर करण्याची आणि निदान रक्षाबंधनाचे महत्त्व लक्षात घेऊन तरी आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडण्याची विनंती करण्यात आली. या कार्यक्रमावेळी तिवसा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कार, पीएसआय अमोल मुळे, विजय वानखडे यांच्यासह अनेक पोलीस कर्मचारी उपस्थित होते. महिलांनी राखी बांधल्यानंतर, पोलिसांनी कायम न्यायाची भूमिका बजावावी हीच खरी ओवाळणी असल्याचे महिला आघाडीच्या वतीने सांगण्यात आले.
हा कार्यक्रम वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर, अंजलीताई आंबेडकर, राज्य उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर आणि जिल्हाध्यक्ष राहुल मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी पूजा गोपाळे, माधुरी थोरात, रुपाली मुंद्रे, सागर भवते, विनोद खाकसे, राहुल मनवर, नितीन थोरात, सागर गोपाळे, प्रवीण निकाळजे आणि भारत दहाट यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संविधान सन्मान महासभेतून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा भाजप – आरएसएसवर जोरदार प्रहार!
ॲड. प्रकाश आंबेडकर : मोहन भागवत हिटलर - मुसोलोनी तुमचा आदर्श! मुंबई : मुंबईच्या ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर आयोजित संविधान...
Read moreDetails






