Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पोलिसांना कर्तव्याची आठवण करून देण्यासाठी वंचित बहुजन महिला आघाडीकडून राख्या

mosami kewat by mosami kewat
August 13, 2025
in बातमी
0
रक्षाबंधनाचा सण केवळ बहिण-भावाच्या प्रेमापुरता मर्यादित न ठेवता, समाजाला एक महत्त्वाचा संदेश देण्यासाठी वंचित बहुजन महिला आघाडीने अनोखा उपक्रम राबवला.

रक्षाबंधनाचा सण केवळ बहिण-भावाच्या प्रेमापुरता मर्यादित न ठेवता, समाजाला एक महत्त्वाचा संदेश देण्यासाठी वंचित बहुजन महिला आघाडीने अनोखा उपक्रम राबवला.

       

चंद्रपूर : रक्षाबंधनाचा सण केवळ बहिण-भावाच्या प्रेमापुरता मर्यादित न ठेवता, समाजाला एक महत्त्वाचा संदेश देण्यासाठी वंचित बहुजन महिला आघाडीने अनोखा उपक्रम राबवला. चंद्रपूर महानगर अध्यक्षा तनुजाताई रायपुरे यांच्या नेतृत्वात महिला कार्यकर्त्यांनी रामनगर पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस बांधवांना राख्या बांधल्या आणि त्यांना नागरिकांच्या संरक्षणाच्या त्यांच्या मूळ कर्तव्याची आठवण करून दिली.
‎
‎यावेळी महिला आघाडीने काही अप्रिय घटनांचा उल्लेख केला. यामध्ये पुणे पोलिसांच्या काही कर्मचाऱ्यांनी महिलांशी दादागिरीने वर्तन केल्याचा आणि तक्रार घेऊन आलेल्या नागरिकांशी बंधुभावाने न वागल्याचा अनुभव सांगितला. समाजामध्ये काही वेळा पोलीस हेच रक्षकऐवजी भक्षक बनल्याचेही दिसून येते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
‎
‎महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी म्हटले की, स्त्रियांच्या सन्मानाची आणि समानतेची भाषा समजत नसेल, तर किमान रक्षाबंधनाच्या नात्याने तरी पोलिसांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव होईल. याच विचारातून, पोलीस कर्मचाऱ्यांना स्त्री-पुरुष नागरिकांच्या मानवी हक्कांचे रक्षण करण्याच्या त्यांच्या भूमिकेची आठवण करून देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
‎
‎पोलिसांचा अपमान करण्याचा आपला कोणताही उद्देश नसून, त्यांना त्यांच्या मूळ कर्तव्याची जाणीव करून देणे हाच यामागे हेतू असल्याचे महिला कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले. समाजात समानता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्यावर त्यांनी भर दिला.
‎
‎या अनोख्या उपक्रमाची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. पोलीस अधिकाऱ्यांनीही महिलांच्या भावनांचा आदर करत त्यांच्या कार्याचे महत्त्व जपण्याचे आश्वासन दिले. या उपक्रमात महानगर महासचीव मोनाली पाटील, चंद्रप्रभा रामटेके, विजया भगत, मंजुषा निरंजने, ललिता दुर्गे, गीता कोंडावार यांची उपस्थिती होती.


       
Tags: policeRakhisVanchit Bahujan Mahila Aghadiचंद्रपूर
Previous Post

मुंबई म्युनिसिपल कामगार संघाच्या मागणीनंतर पालिका प्रशासन कराराचा पुनर्विचार करणार – प्रकाश आंबेडकर

Next Post

तिवसा येथे वंचित बहुजन महिला आघाडीकडून पोलिसांना राखी बांधून कर्तव्याची जाणीव

Next Post
तिवसा येथे वंचित बहुजन महिला आघाडीकडून पोलिसांना राखी बांधून कर्तव्याची जाणीव

तिवसा येथे वंचित बहुजन महिला आघाडीकडून पोलिसांना राखी बांधून कर्तव्याची जाणीव

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!
बातमी

यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!

by mosami kewat
November 5, 2026
0

डॉ. नीरज वाघमारे यांच्या पुढाकारातून बौद्ध एकजुटीचा नवा अध्याय; हजारोंच्या उपस्थितीत सामूहिक वर्षावास सांगता, भंते ज्ञानज्योती महास्थवीर यांच्या धम्मदेशनेने श्रोते...

Read moreDetails
दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

November 5, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा दणका आणि अमेरिकेच्या जागतिक धोरणांचे वास्तव

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा दणका आणि अमेरिकेच्या जागतिक धोरणांचे वास्तव

November 5, 2026
अकोट: स्मार्ट मीटरची स्वयंचलित वीज खंडित प्रणाली तात्काळ बंद करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

अकोट: स्मार्ट मीटरची स्वयंचलित वीज खंडित प्रणाली तात्काळ बंद करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

November 5, 2026
सगळेच्या सगळे चोर! भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गुजराती उद्योगपतींनी खिशात ठेवले - ॲड. प्रकाश आंबेडकर

सगळेच्या सगळे चोर! भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गुजराती उद्योगपतींनी खिशात ठेवले – ॲड. प्रकाश आंबेडकर

November 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home