सोलापूर : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अक्कलकोट शहरात भव्य युवा एल्गार सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेमध्ये पक्षाचे युवा नेते सुजात आंबेडकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून युवकांना मार्गदर्शन करणार आहेत.
ही सभा सोमवार, 15 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता होणार असून, कार्यक्रमाचे ठिकाण मल्लिकार्जुन मंदिराजवळ, एसटी स्टँडसमोर, अक्कलकोट असे निश्चित करण्यात आले आहे.
आगामी काळातील सामाजिक, राजकीय व युवकांसमोरील विविध प्रश्नांवर या सभेत चर्चा होणार आहे. त्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील तसेच परिसरातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.