अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यात रेशन धान्याच्या अपुऱ्या पुरवठ्यावरून वंचित बहुजन आघाडीने जिल्हा प्रशासनाला आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सामान्य रेशनकार्ड धारकांना धान्य अपुरे मिळत असल्याच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची भेट घेऊन तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
निवेदनात वंचित बहुजन आघाडीने म्हटले की, मागील तीन महिन्यांपासून नागरिकांना नियमित रेशन मिळत नाहीये, आणि त्यांना केवळ दोन महिन्यांचे धान्य देऊन तिसऱ्या महिन्याचे धान्य नाकारले जात आहे. अनेक रेशन दुकानांमध्ये ग्राहकांकडून वारंवार अंगठ्याचे ठसे (बायोमेट्रिक) घेतले जात आहेत.
तसेच, दुकाने वेळेवर उघडली जात नाहीत आणि दुकानदारही उपस्थित नसतात, अशा तक्रारीही निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत. या गंभीर प्रकाराची जिल्हा प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी आणि रेशन दुकानदारांवर येत्या दहा दिवसांच्या आत कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
जर यावर त्वरित कार्यवाही झाली नाही, तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे, तसेच हनीफ शेख, योगेश गुंजाळ, जे डी शिरसाठ, प्रवीण ओरे, सुधीर ठोंबे, रवी किसन जाधव, प्रसाद भिवसने, राजीव भिंगारदिवे, गणेश राऊत, अमर निरभवने, चरण हरबा, कैलास पगारे, कैलास काटे, प्रमोद भिंगारदिवे, विश्वास वाघस्कर आणि इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
जातीय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर बहुजनांवर केलेला गुन्हा आहे
ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा राहुल गांधीच्या वक्तव्यावर निशाणा मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अलीकडेच दिलेल्या एका वक्तव्यात "जातीय...
Read moreDetails