Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

२३ मार्चच्या नागपूर मोर्चासाठी वाहनांना टोलमाफी द्या; यवतमाळमध्ये ‘वंचित’चे प्रशासनाला निवेदन

mosami kewat by mosami kewat
March 21, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
२३ मार्चच्या नागपूर मोर्चासाठी वाहनांना टोलमाफी द्या; यवतमाळमध्ये 'वंचित'चे प्रशासनाला निवेदन

२३ मार्चच्या नागपूर मोर्चासाठी वाहनांना टोलमाफी द्या; यवतमाळमध्ये 'वंचित'चे प्रशासनाला निवेदन

       

यवतमाळ : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोर्चात सहभागी होणाऱ्या वाहनांना टोलमाफी देण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात यवतमाळ पश्चिम जिल्हाध्यक्ष डी. के. दामोधर यांच्या नेतृत्वाखाली टोल प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात दिनांक 23 मार्च 2026 रोजी नागपूर (Nagpur) येथील आरएसएस (RSS) मुख्यालयावर संयुक्त मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते नागपूरकडे रवाना होणार आहेत. (Nagpur Protest)

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहराजवळ तुळजापूर–नागपूर महामार्गावर बिजोरा (ता. महागाव) येथे असलेल्या टोल नाक्यावरून मोठ्या प्रमाणात वाहने जाणार असल्याने, या वाहनांकडून कोणत्याही प्रकारची टोल आकारणी करू नये, तसेच कार्यकर्त्यांना अडवू नये, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. (Nagpur Protest)

टोल नाक्यावर कार्यकर्त्यांची अडवणूक किंवा गैरसोय झाल्यास अनुचित प्रकार घडू शकतात आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित टोल प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर महागाव तालुका अध्यक्ष अंकुश कोकरे, धम्मदीप काळबांडे, सयाजीराव कांबळे, अरविंद गरडे, धनंजय ढगे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


       
Tags: Balasaheb AmbedkarMaharashtra politicsMarch 23nagpurNagpurMarchNagpurProtestPolitical NewsPrakash AmbedkarrssRSS HeadquartersToll ExemptionVanchit Bahujan AghadivbaYavatmal News
Previous Post

२३ मार्चच्या ‘आरएसएस’ मुख्यालय मोर्चासाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज; अकोला जिल्ह्यात बैठकांचा धडाका

Next Post

हॅपिनेस इंडेक्स २०२६: स्कॅन्डेनेव्हियन देशांचे यश आणि भारतापुढील आव्हाने

Next Post
हॅपिनेस इंडेक्स २०२६: स्कॅन्डेनेव्हियन देशांचे यश आणि भारतापुढील आव्हाने

हॅपिनेस इंडेक्स २०२६: स्कॅन्डेनेव्हियन देशांचे यश आणि भारतापुढील आव्हाने

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
भीम जयंतीत AI चा अतिरेक धोकादायक : सुजात आंबेडकर
बातमी

भीम जयंतीत AI चा अतिरेक धोकादायक : सुजात आंबेडकर

by mosami kewat
April 12, 2026
0

Pune : भीम जयंतीच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या सादरीकरणात होत असलेल्या विकृतीकरणाबाबत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात...

Read moreDetails
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन! 

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन! 

April 12, 2026
यवतमाळ : विद्यमान पालकमंत्री व माजी मंत्र्यांच्या मतदारसंघात ‘वंचित’ची दमदार एन्ट्री

यवतमाळ : विद्यमान पालकमंत्री व माजी मंत्र्यांच्या मतदारसंघात ‘वंचित’ची दमदार एन्ट्री

April 12, 2026
परंडा येथे महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

परंडा येथे महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

April 11, 2026
शहीद सुशील तेलगोटे यांच्या कुटुंबीयांचे सुजात आंबेडकर यांच्याकडून सांत्वन

Akola : शहीद सुशील तेलगोटे यांच्या कुटुंबीयांचे सुजात आंबेडकर यांच्याकडून सांत्वन

April 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home