Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

२३ मार्चच्या ‘आरएसएस’ मुख्यालय मोर्चासाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज; अकोला जिल्ह्यात बैठकांचा धडाका

mosami kewat by mosami kewat
March 21, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
२३ मार्चच्या 'आरएसएस' मुख्यालय मोर्चासाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज; अकोला जिल्ह्यात बैठकांचा धडाका

२३ मार्चच्या 'आरएसएस' मुख्यालय मोर्चासाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज; अकोला जिल्ह्यात बैठकांचा धडाका

अकोला: वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २३ मार्च २०२६ रोजी नागपूर येथील आरएसएस (RSS) मुख्यालयावर काढण्यात येणाऱ्या संयुक्त मोर्चाच्या नियोजनासाठी अकोला जिल्ह्यात बैठकांचे सत्र पार पडले.

वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने जिल्ह्यातील अकोला, बार्शिटाकाळी, मूर्तिजापूर, तेल्हारा, अकोट आणि पातूर या सर्व तालुक्यांमध्ये महत्त्वपूर्ण बैठका घेऊन कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या बैठकांमध्ये बोलताना पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली. (March 23 Protest)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश अमेरिकेसमोर गहाण ठेवला असून, ते देशविरोधी करार करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. विशेषतः ‘एपस्टीन फाईल्स’ मध्ये नरेंद्र मोदींचे नाव आल्याचा आरोप करत, या गंभीर विषयावर आरएसएस गप्प का आहे? असा सवाल उपस्थित करण्यात आला.

याच मौनाचा जाब विचारण्यासाठी नागपूरच्या संघ मुख्यालयावर धडक देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. (March 23 Protest)

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अकोला जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोर्चाच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा केली. बैठकीला माजी व विद्यमान पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Akola political meetingsAmbedkarite movementBalasaheb Ambedkar rallyMaharashtra politics newsMarch 23 ProtestNagpur newsNagpur political protestopposition protest Indiapolitical rally Maharashtraprotest against RSSRSS headquarters NagpurRSS Nagpur office marchSocial justice protestVanchit Bahujan AghadiVBA protest marchVBA youth wing
Previous Post

गाझियाबाद पोलिसांची मोठी कारवाई; ७ राज्यांत साखळी बॉम्बस्फोटांचा कट उधळला, ISI चे ९ हस्तक अटकेत!

Next Post

२३ मार्चच्या नागपूर मोर्चासाठी वाहनांना टोलमाफी द्या; यवतमाळमध्ये ‘वंचित’चे प्रशासनाला निवेदन

Next Post
२३ मार्चच्या नागपूर मोर्चासाठी वाहनांना टोलमाफी द्या; यवतमाळमध्ये 'वंचित'चे प्रशासनाला निवेदन

२३ मार्चच्या नागपूर मोर्चासाठी वाहनांना टोलमाफी द्या; यवतमाळमध्ये 'वंचित'चे प्रशासनाला निवेदन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पवनचक्की प्रकल्पांविरोधात शेतकरी व ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण; चौकशी व नुकसानभरपाईची मागणी
बातमी

पवनचक्की प्रकल्पांविरोधात शेतकरी व ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण; चौकशी व नुकसानभरपाईची मागणी

by mosami kewat
August 14, 2026
0

नंदुरबार : तालुक्यातील कोळदा, भागसरी, खोंडामळी, विखरण, कलमाडी, कानडदा, सिंदगव्हाण, भालेर, नगाव, काकदें, जुनमोहीदे आणि हाटामोहीदे या गावांच्या परिसरात सुरू...

Read moreDetails
धीरज परदेशी हत्येचा निषेध : चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

धीरज परदेशी हत्येचा निषेध : चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

August 14, 2026
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भाषणानंतर ‘शुद्धी हवन’; VBA चे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे म्हणाले, “जातीवाद आणि अस्पृश्यता आजही जिवंत”

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भाषणानंतर ‘शुद्धी हवन’; VBA चे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे म्हणाले, “जातीवाद आणि अस्पृश्यता आजही जिवंत”

August 14, 2026
शेवगाव : बालमटाकळी येथे मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

शेवगाव : बालमटाकळी येथे मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

August 14, 2026
बसवन संगोगी येथील जिल्हा परिषद मराठी-कन्नड प्राथमिक शाळेची दुरवस्था; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

बसवन संगोगी येथील जिल्हा परिषद मराठी-कन्नड प्राथमिक शाळेची दुरवस्था; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

August 14, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home