निलंगा : महाराष्ट्र विधानसभेत नुकत्याच मंजूर झालेल्या ‘महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयका’विरोधात वंचित बहुजन आघाडीने तीव्र आक्षेप घेतला आहे. हे विधेयक दडपशाही आणि असंविधानिक असून नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे निलंगा तालुका अध्यक्ष भाऊसाहेब बनसोडे यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी निलंगा येथील जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.
बनसोडे यांच्या मते, हे विधेयक स्पष्टपणे नागरिकांच्या असहमती व्यक्त करण्याच्या अधिकारावर गदा आणणारे आहे. निवेदनात म्हटले आहे की, विरोधी पक्षांनी या विधेयकाला विरोध करणे अपेक्षित होते, मात्र तसा प्रयत्न न झाल्याने हे विधेयक विधानसभेत मंजूर झाले.
वंचित बहुजन आघाडीने या विधेयकाला विरोध दर्शवला असून, जर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले, तर सरकारची धोरणे आणि निर्णयांविरुद्ध असहमती, निषेध, बंड किंवा विरोध व्यक्त करणाऱ्या नागरिक, संघटना, राजकीय पक्ष आणि धोरणकर्त्यांना गुन्हेगार ठरवण्यास कायदेशीर मान्यता मिळेल, अशी भीती भाऊसाहेब बनसोडे यांनी व्यक्त केली आहे.
या विधेयकामुळे लोकशाही मूल्यांचे आणि संविधानाने दिलेल्या अधिकारांचे उल्लंघन होईल, असे वंचित बहुजन आघाडीचे म्हणणे आहे.
महापालिकेच्या ढिसाळ कारभाराविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; महिलांच्या हक्कासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा
मुंबई : महापालिकेच्या महिला व बालकल्याण योजनेंतर्गत पात्र महिलांना घरगुती वापरासाठी आवश्यक असलेले साहित्य वाटप न झाल्याने वंचित बहुजन आघाडीने...
Read moreDetails