सोलापूर : अक्कलकोट येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात पार पडले. यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वाचा संदेश दिला. या उद्घाटन सोहळ्याला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मढीखांबे, जिल्हा महासचिव अनिरुद्ध वाघमारे आणि जिल्हा उपाध्यक्ष रविकांत रांजणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात बोलताना जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मढीखांबे म्हणाले की, “बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजातल्या प्रत्येक वंचित व्यक्तीपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे. समाजातील गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी, संविधानाचे रक्षण करण्यासाठी आणि वंचित समाजाला सत्तेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण सर्वांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.”
यावेळी एक विशेष बाब लक्षवेधी ठरली. उद्घाटनानंतर महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमातून समाजात स्त्री-पुरुष समानता रुजवण्यासाठी प्रेरणा मिळाली.
या कार्यक्रमाला तालुका सचिव खाजाप्पा अहिवाळे, सम्यक विद्यार्थी आंदोलनचे राज्य प्रवक्ते रविराज पोटे, अक्कलकोट शहराध्यक्ष शिवाजी चौगुले, शाखा अध्यक्ष गौतम शिवशरण, शाखा सचिव परमेश्वर कांबळे, शाखा उपाध्यक्ष जयभीम वाघमारे, महासचिव आकाश कांबळे, तसेच संगमेश कांबळे आणि अनिल कांबळे यांसारखे मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यासाठी गावातील नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘मीच माझ्या सर्कलचा बाळासाहेब आंबेडकर’ होऊन काम करा, कार्यकर्त्यांना सुजात आंबेडकर यांचे आवाहन
अकोला : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक – २०२५), वंचित बहुजन...
Read moreDetails