मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असताना, वंचित बहुजन आघाडीने (VBA) आज आपल्या उमेदवारांची तिसरी महत्त्वाची यादी अधिकृतपणे जाहीर केली आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर झालेल्या या यादीमुळे मुंबईतील राजकीय समीकरणांमध्ये मोठी खळबळ माजली आहे.
यंदा मुंबईत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने हातमिळवणी केली असून, वंचितच्या वाट्याला आलेल्या ६२ जागांपैकी उर्वरित महत्त्वाच्या प्रभागांसाठी या तिसऱ्या यादीत नावे जाहीर करण्यात आली आहेत. मंगळवार (३० डिसेंबर) हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने, आज जाहीर झालेल्या उमेदवारांनी आपापल्या प्रभागात रॅली आणि शक्तीप्रदर्शनाद्वारे अर्ज भरण्याची तयारी सुरू केली आहे.
तिसऱ्या यादीमध्ये प्रामुख्याने झोपडपट्टी पुनर्विकास (SRA), कामगार वस्ती आणि मराठी-अमराठी बहुल प्रभागांतील कार्यकर्त्यांना स्थान देण्यात आले आहे. पक्षाने सुशिक्षित तरुण, सामाजिक कार्यकर्ते आणि आक्रमक महिला नेत्यांना रिंगणात उतरवून मुंबईच्या महापालिकेत ‘वंचित’चा आवाज बुलंद करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 : तिसरी यादीमध्ये जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे-
१) डॉ. परेश प्रभाकर केळसकर, वॉर्ड क्रमांक. 76, उत्तर पश्चिम मुंबई
२) निधी संदीप मोरे, वॉर्ड क्रमांक. 88, उत्तर मध्य मुंबई
३) सुदर्शन पिठाजी येलवे, वॉर्ड क्रमांक. 98, उत्तर मध्य मुंबई
४) वैशाली संजय सकपाळ, वॉर्ड क्रमांक. 107, ईशान्य मुंबई
५) सूर्यकांत शंकर आमने, वॉर्ड क्रमांक. 113, ईशान्य मुंबई
६) विशाल विठ्ठल खंडागळे, वॉर्ड क्रमांक. 122, ईशान्य मुंबई
७) राम गोविंद बलधर यादव, वॉर्ड क्रमांक. 123, ईशान्य मुंबई
८) रिता सुहास भोसले, वॉर्ड क्रमांक. 124, ईशान्य मुंबई
९) सोनाली शंकर बनसोडे, वॉर्ड क्रमांक. 157, उत्तर मध्य मुंबई






