Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

एपस्टीन फाईल प्रकरणी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; यवतमाळमध्ये मोदींच्या प्रतिमेची होळी करून निषेध

mosami kewat by mosami kewat
March 5, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
एपस्टीन फाईल प्रकरणी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; यवतमाळमध्ये मोदींच्या प्रतिमेची होळी करून निषेध
       

यवतमाळ : जगभरात खळबळ माजवून देणाऱ्या एपस्टीन फाईल प्रकरणावरून आता भारतातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. या प्रकरणात भारतातील बड्या राजकारण्यांची आणि उद्योगपतींची नावे समोर आलेली असतानाही, सत्ताधारी आणि विरोधी पक्ष मूग गिळून गप्प का आहेत? असा सवाल उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतला आहे. यवतमाळ जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेची जाहीर होळी करून या प्रकरणाचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी २ मार्च रोजी मुंबई येथे या प्रकरणावर जाहीर एल्गार पुकारला होता. देशातील प्रमुख नेत्यांची नावे या फाईल्समध्ये असतानाही विरोधी पक्ष गप्प का आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. याच पार्श्वभूमीवर राज्यभर आंदोलनाचे सत्र सुरू झाले आहे. (Vanchit Bahujan Aghadi)

यवतमाळमध्ये झालेल्या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे कार्यकर्त्यांनी आपल्या तोंडाला काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या. विरोधी पक्षांच्या मौनाचा निषेध करण्यासाठी हे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. यावेळी एपस्टीन फाईल प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि सत्य जनतेसमोर यावे, अशी मागणी करण्यात आली.

या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष डॉ. नीरज वाघमारे यांनी केले. यावेळी जिल्हा महासचिव ॲड. संजय इंगळे, अशोककुमार कयापाक, उपाध्यक्ष विशाल पोले, शहर कार्याध्यक्ष प्रमोद पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. (Vanchit Bahujan Aghadi)

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शैलेश भानवे, आनंद भगत, गजानन कोकाटे, यादवराव नगराळे, दीपक वीर, थावरुजी वैद्य, भीमराव शिरसाट, संतोष मसराम, नितेश पाटील, सचिन मोहोड, चंद्रकांत वाळके, उत्तम कांबळे, अरविंद दिवे, केशव भागवत, रामदास वीर, मीरा वीर, करुणा मून, संध्या काळे, भारती सावते, सविता तिडके, सुजाता नगराळे, माला पाटील, अंतरा अंबादे,

लता भरणे, ईंदू सांगळे, विशाखा नगराळे, पूनम अंबादे, सुशीला गजभिये, विजया लोखंडे, माया मस्के, रेखा गजभिये आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनामुळे जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले असून, वंचित बहुजन आघाडीने या आंतरराष्ट्रीय मुद्द्याला स्थानिक पातळीवर आक्रमकपणे मांडल्याचे दिसून आले आहे.


       
Tags: bjpEpstein fileMaharashtranarendra modiPrakash AmbedkarprotestVanchit Bahujan AghadiYavatmal
Previous Post

एसबीएल एनर्जी कंपनीवर कारवाई करा; वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Next Post

पंचशील आणि २२ प्रतिज्ञांचे आचरण हाच खरा धम्मप्रचार; माजलगाव येथे जिल्हास्तरीय धम्मप्रचारक गौरव सोहळा उत्साहात पार

Next Post
पंचशील आणि २२ प्रतिज्ञांचे आचरण हाच खरा धम्मप्रचार; माजलगाव येथे जिल्हास्तरीय धम्मप्रचारक गौरव सोहळा उत्साहात पार

पंचशील आणि २२ प्रतिज्ञांचे आचरण हाच खरा धम्मप्रचार; माजलगाव येथे जिल्हास्तरीय धम्मप्रचारक गौरव सोहळा उत्साहात पार

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Mumbai Dabbawala Service LPG Gas Shortage Impact: डबेवाल्यांचे उत्पन्न घटले; हजारो डब्यांची संख्या शेकड्यावर, १५० वर्षात प्रथमच अशी स्थिती
बातमी

Mumbai Dabbawala Service LPG Gas Shortage Impact: डबेवाल्यांचे उत्पन्न घटले; हजारो डब्यांची संख्या शेकड्यावर, १५० वर्षात प्रथमच अशी स्थिती

by mosami kewat
March 25, 2026
0

Mumbai Dabbawala Service LPG Gas Shortage Impact: पश्चिम आशियातील इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा वणवा आता भारताच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचला आहे....

Read moreDetails
पत्नी म्हणजे घरकाम करणारी महिला नव्हे!

पत्नी म्हणजे घरकाम करणारी महिला नव्हे!

March 25, 2026
सिलॅबसबाहेरचा ट्रम्प आणि नवउदारमतवादाचा 'एक्सपायरी डेट' संपलेला अजेंडा!

सिलॅबसबाहेरचा ट्रम्प आणि नवउदारमतवादाचा ‘एक्सपायरी डेट’ संपलेला अजेंडा!

March 25, 2026
Lok Sabha Seats : लोकसभेत महिला आरक्षणाची नांदी, मतदारसंघांची संख्या थेट 816 वर पोहोचणार

Lok Sabha Seats : लोकसभेत महिला आरक्षणाची नांदी, मतदारसंघांची संख्या थेट 816 वर पोहोचणार

March 25, 2026
पूर्णा तालुक्यात भारतीय बौद्ध महासभेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात

पूर्णा तालुक्यात भारतीय बौद्ध महासभेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात

March 25, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home