Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home अर्थ विषयक

सिलॅबसबाहेरचा ट्रम्प आणि नवउदारमतवादाचा ‘एक्सपायरी डेट’ संपलेला अजेंडा!

mosami kewat by mosami kewat
March 25, 2026
in अर्थ विषयक
0
सिलॅबसबाहेरचा ट्रम्प आणि नवउदारमतवादाचा 'एक्सपायरी डेट' संपलेला अजेंडा!

सिलॅबसबाहेरचा ट्रम्प आणि नवउदारमतवादाचा 'एक्सपायरी डेट' संपलेला अजेंडा!

       

– संजीव चांदोरकर

नवउदारमतवादी म्हणतात डोनाल्ड ट्रम्प आमच्या “सिलॅबस” मध्ये नव्हता !

माझ्याच वयाचा मित्र नव्वदीपासून नवउदारमतवादी आर्थिक तत्वज्ञानाचा कट्टर पुरस्कर्ता राहिला आहे. त्याचा ताप गेली ४५ वर्षे उतरलाच नाही.  

आमचे नेहमी मैत्रीपूर्ण वाद व्हायचे. त्याचे आपले तेच पालुपद. देशांतर्गत सर्व काही मार्केटवर सोपवले पाहिजे. राष्ट्रांच्या सीमा नकोत. जगात मुक्त व्यापार हवा. सरकारने अर्थव्यवस्थेतून बाजूला व्हायला हवे इत्यादी. 

अलिकडे बऱ्याच दिवसांनी भेटला. गप्प गप्प होता. थोडा नर्व्हस होता. 

मी म्हटले की डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आला. त्याने आयातकर पासून अनेक बिगर आर्थिक क्लुप्त्या वापरून जागतिक व्यापाराचा सारीपाट उधळून लावला. जागतिक व्यापाराचे महामंत्र सर्व राष्ट्रांना म्हणायला लावणारी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन अचानक अदृश्य झाली. इराण युद्धाने तर संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्था ऊर्जा संकटामुळे कड्यावर उभी केली गेली. आमच्याच देशाचे हित सर्वप्रथम, बाकीची राष्ट्रे गेली खड्यात म्हणू लागला. देशांवर हल्ले केले. युद्धे छेडली. बाकीचे जाऊदे तो खुद्द अमेरिकेची अर्थव्यवस्था डबघाईला आणणार आहे. 

आणि हे कोणत्या देशात ? तर नवउदारमतवादाचा पुरस्कर्ताच नाही तर ड्रायव्हिंग फोर्स असणाऱ्या खुद्द अमेरिकेत !

माझ्या मित्राला विचारले की तुम्ही नवउदारमतवाद्यांचे ट्रम्प यांचे विश्लेषण काय आहे ? कोठे गेला मुक्त जागतिक व्यापार ? कोठे गेली जगाला छडी घेऊन जागतिक व्यापाराची तत्वे शिकवणारी तुमची ती डब्ल्यू टी ओ! 

तर तो म्हणाला आमच्या डोनाल्ड ट्रम्प आमच्या सिलॅबस मध्ये नव्हता 

मी विचारले पण ते सिलॅबस बनवले होते कोणी? 

हे बर आहे. आपणच सिलॅबस बनवायचे. आपणच पेपर सेट करायचे. आपणच परीक्षक. आपणच जाहीर करायचे कि आपण डिस्टिंक्शनने उत्तीर्ण झालो. आणि आता म्हणायचे आताच पेपर सिलॅबस बाहेरचा आहे. 

Xxxxx शिवी घालून म्हणालो. मधल्या या दशकात जगातील शेकडो कोटी लोकांना अजून गाळात ढकलले. जगातील एक टक्का , फार तर पाच टक्के लोकांना त्यांच्या पुढच्या शंभर [पिढ्या बसून खातील अशी संपत्ती कमावून दिलीत. पर्यावरणाची मारून ठेवलीत. ज्याची किंमत न जन्मलेल्या पिढ्या भोगणार आहे 

बर ते जाऊदे. मी मित्राला म्हणालो. 

तू ४० वर्षे नवउदारमतवादाच्या चिपळ्या वाजवतो आहेस. तर जे नवउदारमतवादाचे लाभार्थी आहेत त्यांनी एक दोन कोटी किंवा काही लाख रुपयांचे तुकडे तरी फेकले का तुझ्यासमोर ? फूट सोल्जर रे तुम्ही ! 

अंधभक्त प्रत्येक क्षेत्रात असतात. नवउदारमतवादाने तर मोहीम उघडली अंधभक्तांच्या अंधभक्त टोळ्या बनवण्याची. विश्वविद्यालये, मीडिया, नोकरशहा, बँकर्स, थिंक टँक्स मध्ये. 

नव्वदीच्या दशकात नवउदारमतवादी आर्थिक तत्त्वज्ञानाच्या विचारांचा व्हायरस जगभर पसरवला गेला. कोरोना नंतर आला. कोरोना जिवाणूंचा पर्सनल अजेंडा तरी नव्हता. नऊदरमतवादाचा खतरनाक पर्सनल अजेंडा होता आणि आहे. 

कोरोना महामारी संपली. पण नवउदारमतवादी आर्थिक विचारांचा व्हायरस अजूनही हवेत आहे 

डोनाल्ड ट्रम्प, मागा आंदोलन, जगभरातील फॅसिझम, अतिरेकी राष्ट्रवाद हे नव उदारमतवादाचे अपत्य आहे 

तरुणांना आवाहन. व्हायरसला बळी पडायचे नसेल तर अंगी प्रतिकारक्षमता बाणवावी लागते. डावे उजवी बायनरी फसवी आहे. ओरिजनल, समोर दिसत आहे त्याला फेसव्हॅल्यूवर न घेता प्रश्न विचारण्याचे धैर्य देणारी ओरिजिनल विचारक्षमता म्हणजे प्रतिकारक्षमता. ती अंगी बाणवा. 

आमची पिढी पुढच्या काही वर्षात काळाच्या पडद्याआड जाणार आहे. ही पृथ्वी, हा निसर्ग, हा समाज, देश, देशांतर्गत आणि देशाबाहेरील सौहार्द तुमच्या हातात असणार आहे. तुमच्या मुलाबाळांचे भवितव्य त्यावर निर्भर असणार आहे. 


       
Tags: GlobalNeoliberalism Trump
Previous Post

Lok Sabha Seats : लोकसभेत महिला आरक्षणाची नांदी, मतदारसंघांची संख्या थेट 816 वर पोहोचणार

Next Post

पत्नी म्हणजे घरकाम करणारी महिला नव्हे!

Next Post
पत्नी म्हणजे घरकाम करणारी महिला नव्हे!

पत्नी म्हणजे घरकाम करणारी महिला नव्हे!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पवनचक्की प्रकल्पांविरोधात शेतकरी व ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण; चौकशी व नुकसानभरपाईची मागणी
बातमी

पवनचक्की प्रकल्पांविरोधात शेतकरी व ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण; चौकशी व नुकसानभरपाईची मागणी

by mosami kewat
August 14, 2026
0

नंदुरबार : तालुक्यातील कोळदा, भागसरी, खोंडामळी, विखरण, कलमाडी, कानडदा, सिंदगव्हाण, भालेर, नगाव, काकदें, जुनमोहीदे आणि हाटामोहीदे या गावांच्या परिसरात सुरू...

Read moreDetails
धीरज परदेशी हत्येचा निषेध : चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

धीरज परदेशी हत्येचा निषेध : चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

August 14, 2026
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भाषणानंतर ‘शुद्धी हवन’; VBA चे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे म्हणाले, “जातीवाद आणि अस्पृश्यता आजही जिवंत”

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भाषणानंतर ‘शुद्धी हवन’; VBA चे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे म्हणाले, “जातीवाद आणि अस्पृश्यता आजही जिवंत”

August 14, 2026
शेवगाव : बालमटाकळी येथे मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

शेवगाव : बालमटाकळी येथे मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

August 14, 2026
बसवन संगोगी येथील जिल्हा परिषद मराठी-कन्नड प्राथमिक शाळेची दुरवस्था; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

बसवन संगोगी येथील जिल्हा परिषद मराठी-कन्नड प्राथमिक शाळेची दुरवस्था; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

August 14, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home