Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Lok Sabha Seats : लोकसभेत महिला आरक्षणाची नांदी, मतदारसंघांची संख्या थेट 816 वर पोहोचणार

mosami kewat by mosami kewat
March 25, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
Lok Sabha Seats : लोकसभेत महिला आरक्षणाची नांदी, मतदारसंघांची संख्या थेट 816 वर पोहोचणार
       

Lok Sabha Seats : केंद्र सरकारकडून लोकसभेच्या रचनेत मोठे बदल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या ५४३ सदस्यांची असलेली लोकसभा पुढील काळात तब्बल ८१६ सदस्यांची होऊ शकते, असा प्रस्ताव चर्चेत आहे. या संभाव्य बदलामध्ये महिलांसाठी एक-तृतीयांश म्हणजे सुमारे २७३ जागा राखीव ठेवण्याचाही विचार सुरू आहे. ही नवी रचना २०२९ च्या लोकसभा निवडणुकांपासून लागू होऊ शकते.

या प्रस्तावानुसार देशातील बहुतेक राज्यांमध्ये लोकसभा जागांची संख्या लक्षणीय वाढेल. महाराष्ट्र राज्यातील सध्याच्या ४८ जागा वाढून ७२ होण्याची शक्यता असून, त्यापैकी २४ जागा महिलांसाठी राखीव असतील. त्याचप्रमाणे पश्चिम बंगाल मध्ये ४२ वरून ६३, बिहार मध्ये ४० वरून ६०, तर तामिळनाडू मध्ये ३९ वरून ५९ जागा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मध्य प्रदेश मध्येही जागांची संख्या २९ वरून ४४ पर्यंत वाढू शकते.

लहान राज्यांनाही या बदलाचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांच्या जागा २ वरून ३ होऊ शकतात. तर मिझोरम, नागालँड आणि सिक्कीम यांना प्रत्येकी १ ऐवजी २ जागा मिळण्याची शक्यता आहे.

केंद्रशासित प्रदेशांमध्येही वाढ अपेक्षित आहे. दिल्ली येथील जागा ७ वरून ११ पर्यंत जाऊ शकतात, तर जम्मू आणि काश्मीर मध्ये ५ वरून ८ जागा होण्याची शक्यता आहे. मात्र लडाख आणि पुदुच्चेरी यांसारख्या एकच जागा असलेल्या केंद्रशासित प्रदेशांबाबत अजून स्पष्ट चित्र समोर आलेले नाही.

या संपूर्ण प्रक्रियेसाठी मतदारसंघांची नव्याने आखणी, म्हणजेच delimitation, केली जाईल आणि ती २०११ च्या जनगणनेवर आधारित असण्याची शक्यता आहे. या बदलांमुळे देशाच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची चिन्हे असून, विशेषतः महिलांच्या राजकीय सहभागात लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


       
Tags: delhiPoliticalVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

पूर्णा तालुक्यात भारतीय बौद्ध महासभेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात

Next Post

सिलॅबसबाहेरचा ट्रम्प आणि नवउदारमतवादाचा ‘एक्सपायरी डेट’ संपलेला अजेंडा!

Next Post
सिलॅबसबाहेरचा ट्रम्प आणि नवउदारमतवादाचा 'एक्सपायरी डेट' संपलेला अजेंडा!

सिलॅबसबाहेरचा ट्रम्प आणि नवउदारमतवादाचा 'एक्सपायरी डेट' संपलेला अजेंडा!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home